🕒 1 min read
मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील शेवटचा सामना आज बंगळुरू येथे खेळायला जाणार आहे. हा सामना बंगळुरूतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर संध्याकाळी सात वाजता सुरू होईल. सामन्याच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार केशव महाराजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या दोन्ही संघ पाच सामन्यांच्या मालिकेत २-२ ने बरोबरीत आहेत. त्यामुळे शेवटच्या सामन्यात जो संघ बाजी मारेल तो संघ मालिकेत विजेता ठरेल. बंगळुरूतील हे मैदान सर्वात लहान असल्याने या मैदानावर मोठी धावसंख्या होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सामन्यात नाणेफेकीचा कौलही महत्त्वाचा ठरणार आहे. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या चार सामन्यात एकदाही भारतीय कर्णधारला नाणेफेक जिंकता आलेली नाही.
मागील खेळायला गेलेल्या तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात भारतीय संघाने जोरदार विजय मिळवल्यामुळे या सामन्यात भारतीय संघाचे पारडे जड भासत आहे. तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेच्या संघावर दुखापतीचे सावट दिसत आहे. मालिकेच्या सुरुवातीच्या पहिल्या दोन्ही सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतावर मोठ्या फरकाने विजय मिळवले होते. सुरुवातीला दक्षिण आफ्रिका मालिकेत २-० अशा फरकाने आघाडीवर होते. मात्र त्यानंतर भारतीय संघाने मालिकेत पुनरागमन करत विशाखापट्टणम येथील सामना ४८ धावांनी जिंकला. त्यानंतर खेळला गेलेला राजकोट येथील चौथा सामना भारतीय संघाने ८२ धावांनी जिंकला होता.
???? Toss Update ????
South Africa have elected to bowl against #TeamIndia in the fifth & final T20I of the series.
Follow the match ▶️ https://t.co/uAE094Srh7 #INDvSA | @Paytm pic.twitter.com/XjlFe4GMdo
— BCCI (@BCCI) June 19, 2022
5TH T20I. South Africa won the toss and elected to field. https://t.co/NtR62APKMZ #INDvSA @Paytm
— BCCI (@BCCI) June 19, 2022
दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हन
भारत – ऋतुराज गायकवाड, इशान किशन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, युझवेंद्र चहल.
दक्षिण आफ्रिका – क्विंटन डी कॉक, रिझा हेंड्रिक्स, ड्वेन प्रिटोरियस, रासी व्हॅन डर ड्यूसेन, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, ट्रीस्टन स्टब्स, कागिसो रबाडा, केशव महाराज(कर्णधार), एनरिक नॉर्किया.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
