🕒 1 min read
मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात मालिकेतील शेवटचा निर्णायक सामना खेळला जात आहे. या दोन्ही संघातील शेवटचा सामना बंगळुरूतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरू आहे. मात्र या सामन्यात पावसाने हजेरी लावल्याने खेळ थांबवण्यात आला आहे. नाणेफेक झाल्यानंतर सामना सुरू होण्याअगोदर ही पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर थोड्यावेळासाठी पाऊस बंद झाला मात्र सामन्यात तीन षटक पडल्यानंतर पुन्हा पाऊस सुरु झाला. त्यामुळे पंतांच्या मध्यस्थीने खेळ काही वेळासाठी थांबविण्यात आला आहे.
सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार केशव महाराज याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताकडून सलामीला ईशान किशन आणि ऋतुराज गायकवाड यांनी डावाची सुरुवात केली. मात्र खेळ थांबेपर्यंत भारत २८ धावांवर २ विकेट अशा स्थितीत आहे. ईशान किशन १५ धावा करून बाद झाला. तर ऋतुराज गायकवाडला पुन्हा एकदा मोठी धावसंख्या करण्यात अपयश आले. ऋतुराज १० धावा करून बाद झाला. आता खेळपट्टीवर भारतीय संघाचा कर्णधार रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर हे खेळत होते.
???? Rain stops play in Bengaluru.
We will be back with further updates. #TeamIndia | #INDvSA | @Paytm pic.twitter.com/VESWqgLX8J
— BCCI (@BCCI) June 19, 2022
नाणेफेकीनंतर सामना सुरू होण्याअगोदर पाऊस आल्यामुळे हा सामना २० षटकांऐवजी १९ षटकांचा करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावल्याने यामध्ये आणखी षटक कमी होण्याची चाहत्यांना भीती आहे. आजचा हा सामना जिंकून भारतीय संघाला इतिहास रचण्याची संधी आहे. भारतीय संघ आजचा सामना जिंकला तर इतिहासात पहिल्यांदाच भारत मायदेशात दक्षिण आफ्रिकेला हरवण्यात यश मिळवेल.
दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हन
भारत – ऋतुराज गायकवाड, इशान किशन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, युझवेंद्र चहल.
दक्षिण आफ्रिका – रिझा हेंड्रिक्स, क्विंटन डी कॉक, ड्वेन प्रिटोरियस, रासी व्हॅन डर ड्यूसेन, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, ट्रीस्टन स्टब्स, कागिसो रबाडा, केशव महाराज (कर्णधार), एनरिक नॉर्किया, तबरेझ शम्सी.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
