मुंबई : काल (८ जून) रोजी औरंगाबाद येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. मागील काही दिवसांपासून शिवसेनेने या सभेसाठी जोरदार तयारी केली होती. औरंगाबादमध्ये गावागावात बैठका घेत शिवसेनेने शक्ती पणाला लावली होती.
मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर ही सभा झाली. या सभेला शिवसेनेने स्वाभिमान सभा असे नाव दिले होते. या सभेत उद्धव ठाकरेंनी विरोधकांना सणसणीत प्रत्युत्तर दिले आहे.