Share

नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यावर ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

Published On: 

मुंबई :   भाजपच्या नेत्या नुपूर शर्मा यांनी पैगंबर महम्मद यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी केली होती. त्यामुळे त्या चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. या वक्तव्यावरून नुपूर शर्माला भाजपमधून निलंबित करण्यात आले आहे. त्यांनी याबाबतीत माफीही मागितली आहे. पण त्यांना  जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे नुपूर यांनी त्यांच्या  सोशल मिडिया पोस्टद्वारे सांगितले. यादरम्यान ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढे येऊन हे विष पसरण्यापासून थांबवलं पाहिजे असं मत मांडलं आहे.

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये नसीरुद्दीन शाह म्हणाले, “या लोकांमध्ये चांगली भावना निर्माण होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुढाकार घेतला पाहिजे. तसंच धर्मसंसदेत जे बोललं गेलं त्यावर त्यांचा विश्वास असेल तर त्यांनी तसं सांगावं आणि नसेल तर तसंही स्पष्ट करावं,” असं आवाहन त्यांनी केले आहे.

नुपूर शर्मा यांना पक्षातून निलंबित केल्यानंतर भाजपकडून एक पत्र जारी करण्यात आले होते. त्या पत्रात म्हटले होते की, “अशा टिप्पणी भाजपच्या मूळ कल्पनेच्या विरोधात आहेत”. या संपूर्ण प्रकरणावर नुपूर यांनी  माफी देखील मागितली. त्या  म्हणाल्या, मला कोणाच्याही धार्मिक भावना दुखवायच्या नव्हत्या, जर माझ्या बोलण्याने कोणाच्या धार्मिक भावना दुखावल्या असतील तर मी माझे शब्द माघारी घेते.

महत्वाच्या बातम्या : 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!