🕒 1 min read
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार कपिल देव यांनी नुकतीच महान फलंदाज विराट कोहलीवर मोठी प्रतिक्रिया दिली होती. विराट कोहलीचा खराब फॉर्म पाहता त्याला भारतीय संघातून वगळण्यात यावे, असे ते म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्यावर ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर उस्मान ख्वाजाने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. विराट कोहलीबद्दल बोलायचे झाले तर त्याची बॅट बऱ्याच दिवसांपासून शांत आहे. प्रत्येक फॉरमॅटमध्ये तो सतत फ्लॉप होत आहे. २०१९ पासून त्याने बॅटने एकही शतक झळकावलेले नाही. यावरून तो किती खराब फॉर्ममध्ये आहे याचा अंदाज सहज लावता येईल.
विराट कोहलीच्या खराब फॉर्मबद्दल कपिल देव म्हणाले की, त्याला संघातून वगळले पाहिजे. कपिल देव यांच्या म्हणण्यानुसार, जर अश्विनसारख्या अनुभवी गोलंदाजाला बेंचवर बसवता येते, तर विराट कोहलीला का वगळले जाऊ शकत नाही. उस्मान ख्वाजा यांनी कपिल देव यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. कपिल देव यांचे हे विधान आयसीसीने पोस्ट केल्यानंतर महान ऑस्ट्रेलियन क्रिकेटर उस्मान ख्वाजाने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. ख्वाजा म्हणाला की, ‘विराट कोहलीची सरासरी ५० आणि स्ट्राइक रेट १४० च्या आसपास आहे. चांगला निर्णय आहे. ऑस्ट्रेलिया या निर्णयाशी सहमत आहे.’
Kapil Dev has his say on Virat Kohli's place in India's T20I side ????️
More ???? https://t.co/TTW2ss75fq pic.twitter.com/TeBfYsotAp
— ICC (@ICC) July 10, 2022
उस्मान ख्वाजाच्या या विधानाकडे बारकाईने नजर टाकली तर त्याने कपिल देव यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. त्याच्या मते, विराट कोहलीची टी-२० मध्ये सरासरी इतकी चांगली असूनही, त्याला वगळल्यास ऑस्ट्रेलियाला टी-२० विश्वचषक स्पर्धेत मदत होईल. याआधी विराट कोहलीचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनीही कपिल देव यांच्या वक्तव्यावर तिखट प्रतिक्रिया दिली होती. राजकुमार शर्मा यांनी त्यांच्या वक्तव्याशी असहमत असून त्यांनी असे वक्तव्य करायला नको होते, असे म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
