Share

IND vs ENG : विराट कोहलीच्या खराब कामगिरीबाबत इंग्लंडच्या माजी कर्णधाराचं मोठं वक्तव्य, म्हणाला…

Published On: 

मुंबई : भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली सातत्याने खराब फॉर्मशी झुंजत असून त्याच्यावर टीकाही होत आहे. दरम्यान, इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने विराटचे समर्थन केले आहे. वॉनच्या मते, विराटने फॉर्ममध्ये परतण्याची संकेत दिले आहेत. त्यामुळे तो एका विशिष्ट मोठ्या खेळीपासून दूर नाही. विराटने इंग्लंडविरुद्ध ३ सामन्याच्या टी-२० मालिकेतील दोन टी-२० सामन्यांमध्ये भाग घेतला होता. यादरम्यान त्याच्या बॅटमधून केवळ १२ धावा निघाल्या. त्याच्या खराब कामगिरीमुळे अनेक क्रिकेट तज्ज्ञही त्याला संघातून वगळण्याचा सल्ला देत आहेत.

विराट आता १२ जुलैपासून इंग्लंडविरुद्धच्या ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत खेळताना दिसणार आहे. या सामन्याचे पूर्वावलोकन करताना वॉन म्हणाला की, ‘एकदिवसीय सामन्यांमध्ये कोहलीवर जास्त लक्ष दिले जाईल. क्रिकबझशी बोलताना तो म्हणाला की, ‘या मालिकेत सर्वांचे लक्ष विराट कोहलीच्या कामगिरीवर असणार आहे. भारताला त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे. त्यामुळे विराटला या मालिकेत धावा बनवाव्या लागणार आहेत. काही काळापूर्वी आम्ही म्हणत होतो की मर्यादित षटकांच्या क्रिकेटच्या इतिहासात लक्ष्याचा पाठलाग करणारा तो महान फलंदाज आहे. तो या मालिकेत त्याच्याकडून उत्तम कामगिरी करेल अशी मला खात्री आहे. विराटने सातत्याने धावा कराव्यात अशी माझी इच्छा आहे.’ असेही यावेळी इंग्लंडचा माजी कर्णधार म्हणाला.

रोहित शर्मानेही विराटचा बचाव केला

टी-२० मालिकेतील शेवटच्या सामन्यानंतर विराट कोहलीच्या सातत्यपूर्ण खराब कामगिरीमुळे त्याला प्लेइंग इलेव्हनमधून वगळल्याची चर्चा आहे. मात्र कर्णधार रोहित शर्मा या गोष्टींशी सहमत नाही. तिसऱ्या टी-२० सामन्यानंतर पत्रकार परिषदेदरम्यान रोहित शर्माला कोहलीच्या संघातील स्थानाबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तो चांगलाच संतापला. रोहित शर्मा म्हणाला की, ‘बाहेरचे लोक काय बोलतात ते आम्ही ऐकत नाही. त्यामुळे आम्हाला त्याची पर्वा नाही. असे बोलणारे हे तज्ज्ञ कोण आहेत आणि त्यांना तज्ञ का म्हणतात हे मला माहीत नाही. हे माझ्या आकलनापलीकडचे आहे. आम्ही एक संघ तयार करतो आणि त्याची एक प्रक्रिया असते. आम्ही खेळाडूंच्या गुणवत्तेचे समर्थन करतो. केवळ दोन वर्षांच्या खराब कामगिरीच्या जोरावर त्याने इतकी वर्षे धावा केल्या आहेत, त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. अशा शब्दात रोहित शर्माने विराट कोहलीवर टीका करणाऱ्यांना उत्तर दिले.

एकदिवसीय मालिकेसाठी भारताचा संभाव्य संघ

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र सिंग चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, प्रसिध्द कृष्णा, मुहम्मद शमी, मुहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!