Share

भारत विरुद्ध वेस्टइंडीज एकदिवसीय  मालिका येत्या ६ फेब्रुवारी पासून

Published On: 

वेस्टइंडीज क्रिकेट संघ ६ फेब्रुवारी पासून भारत दौऱ्यावर येणार आहे. या वेस्टइंडीजच्या भारत दौऱ्यात  ३ एकदिवसीय आणि टी-२० सामने खेळवण्यात येणार आहेत. एकदिवसीय मालिका अहमदाबाद येथे होणार असून टी २० मालिका कोलकत्ता येथे  होणार आहे. तीन एकदिवसीय सामने अहमदाबाद  येथील नरेंद्र मोदी मैदानावर होणार आहेत. तर टी २० सामने कोलकत्ता येथील ईडन गार्डन येथे होणार आहेत. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात इंग्लंड विरुद्ध भारत दरम्यान एकदिवसीय मालिकेचे अहमदाबाद येथे आयोजन करण्यात आले होते. या इंग्लंड विरुद्ध भारत मधील एकदिवसीय सामन्यांकरता जास्तीत जास्त ५०% प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली होती. परंतु या वर्षी वेस्टइंडीज विरुद्ध भारत मधील एकदिवसीय सामन्यांकरता प्रेक्षकांना उपस्थित राहता येणार नाहीये.

 

कोलकत्ता येथील ईडन गार्डन वर होणाऱ्या टी २० सामन्यांच्या मालिकेसाठी ७५% प्रेक्षकांना उपस्थित राहता येणार आहे. मात्र अहमदाबाद येथील होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी प्रेक्षकांना उपस्थितीत राहता येणार नसल्यामुळे क्रिकेट रसिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. गुजरात राज्यात वाढणाऱ्या कोरोना रुग्णांमुळे आम्ही अहमदाबाद येथील एकदिवसीय मालिकेसाठी प्रेक्षकांना मैदानावर उपस्थित राहण्यास परवानगी नाकारत आहोत अशी माहिती आज गुजरात क्रिकेट असोसिएशनने दिली.

 

सध्याची ओमायक्रॉन आणि एकूणच कोविड रुग्णांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता भारत आणि वेस्टइंडीज मधील सर्वच एकदिवसीय सामने प्रेक्षकांविनाच खेळवण्यात येणार असल्याची माहिती गुजरात क्रिकेट महासंघाने दिली आहे. ६, ९ आणि ११ फेब्रुवारी या तीन दिवशी एकदिवसीय सामने होणार असून ६ फेब्रुवारी रोजी होणारा एकदिवसीय सामना भारतासाठी ऐतिहासिक ठरणार असून हा सामना भारताचा १००० वा एकदिवसीय सामना असणार आहे .

 

 

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!