मुंबई: २०२२-२३ वर्षाचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मालिक यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, नरेंद्र मोदींनी २०१४ मध्ये सत्तेत येताना दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र या अर्थसंकल्पात फक्त ६० लाख रोजगार निर्मिती करू शकतो, हा नवीन जुमला फेकण्यात आला आहे.
अर्थसंकल्पात ८० लाख नवीन घरे तयार करण्याची घोषणा देण्यात आली. यावर मलिक म्हणाले की, नरेंद्र मोदी २०२२ पर्यंत प्रत्येक माणसाला हक्काचे घर देणार होते, त्याचे काय झाले. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांच्या उत्पनाला दुप्पट करण्याच्या आश्वासनाची आठवण ही नवाब मालिकांनी मोदींना करून दिली.
मलिक पुढे म्हणाले, ‘देशातील वाढत्या महागाईमुळे मध्यमवर्ग, नोकरदार वर्गाला करामध्ये काही सवलत मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र असे झाले नाही. या बजेटच्या माध्यमातून देशातील कोणत्याही घटकाला काहीही मिळालेले नाही.’ मोदी सरकारने एयर इंडियानंतर एलआयसीचे भाग भांडवल विकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर बोलताना नवाब मलिक यांनी मोदी सरकार देशाची संपत्ती विकून देश चालवण्याचे काम करत आहे, असी टीका केली आहे.
१ फेब्रुवारीला सकाळी निर्मला सीतारामन यांनी देशाचे २०२२ साठीचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात मोदी सरकारने अनेक आश्वासने दिली आहेत. त्यांनतर विरोधी पक्ष या अर्थसंकल्पावर चौफेर टीका करत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
‘शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना उभारी देणारा अर्थसंकल्प’; गिरीश महाजन यांचे वक्तव्यं
‘नव्या बाटलीत जुने पेय म्हणजे केंद्रीय अर्थसंकल्प’; सुभाष देसाई यांचा टोला
नितेश राणे यांना जामीन मिळवण्यासाठी आधी शरण जावं लागेल – अनिल परब


