लखनऊ: येथील सेंट्रल मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सदफ जफर यांच्या उमेदवारी अर्जात सहभागी होण्याकरिता कन्हैय्या कुमार तेथे पोहोचला असता त्याच्यावर शाई फेकण्यात आली. लखनऊ सेंट्रल मतदार संघातून काँग्रेसने अभिनेत्री, सामाजिक कार्यकर्त्या सदफ जफर यांना उमेदवारी दिली असून जफरने निर्माती मीरा नायर यांच्या ‘अ सुटेबल बॉय’ या चित्रपटात अभिनेत्रीची भूमिका केली आहे. तसेच जफर हिने २०१९ मधील नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात लखनऊ येथे आंदोलनात सहभाग घेतला होता. त्यावेळी तिला अटक करण्यात आली होती व नंतर जामिनावर सुटका झाली होती.
विशेष म्हणजे काँग्रेसच्या पक्षाच्या कार्यालयातच ही शाई त्याच्यावर फेकण्यात आली. परंतु ती शाई नसून ते एका प्रकारचे अॅसिड असल्याचा दावा काँग्रेस पक्षाने केला. सुदैवाने कन्हैय्या कुमारवर मात्र ते उडाले नसून काही थेंब शेजारी उभ्या असलेल्या चार युवकांवर उडाले.
हल्ला करणाऱ्या एका युवकास जमावाने मारहाण करत पोलिसांच्या स्वाधीन केले. हल्ला करणाऱ्या युवकाची पोलिस कसून चौकशी करत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
रिंकू राजगुरू गेली ‘या’ अभिनेत्यासोबत डिनर डेटला, अफेअरची जोरदार चर्चा
‘शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना उभारी देणारा अर्थसंकल्प’; गिरीश महाजन यांचे वक्तव्यं
‘नव्या बाटलीत जुने पेय म्हणजे केंद्रीय अर्थसंकल्प’; सुभाष देसाई यांचा टोला
नितेश राणे यांना जामीन मिळवण्यासाठी आधी शरण जावं लागेल – अनिल परब
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

