Share

‘या अर्थसंकल्पातून सर्वच घटकांची निराशा’; नाना पटोलेंची प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी आज अर्थसंकल्प (Budget 2022) सादर केला. यात त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. त्याच सोबत शेतकऱ्यांसाठी देखील अनेक महत्वपूर्ण योजनांची घोषणा केली आहे. मात्र विरोधकांकडून या अर्थसंकल्पावर टीका होत आहे. कॉंग्रेस तसेच राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यानी देखील या अर्थसंकल्पावर टीका केली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील प्रतिक्रिया देत टीका केली आहे. अजित पवार म्हणाले, यंदाचाही अर्थसंकल्प अर्थहीन असल्याचे यांनी म्हणले आहे. या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळाले हे शोधूनही सापडणार नाही, अशी टीका देखील पवार यांनी यावेळी केली आहे. तसेच शिवसेना नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) म्हणाले, नव्या बाटलीत जुने पेय, अशा शब्दात अर्थसंकल्पावर टीका केली आहे.

या पार्श्वभूमीवर आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी देखील या अर्थसंकल्पावर टीका केली आहे. नाना पटोले म्हणाले, अमृत महोत्सवी वर्षातील अर्थसंकल्पात जनतेला अमृताचा अनुभव मिळेल असा दावा केला जातोय. पण या अर्थसंकल्पात नवीन काहीही नाही, अमृताचा अनुभव तर नक्कीच होत नाही. या अर्थसंकल्पातून शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, नोकरदार, तरुणवर्गासह सर्व घटकांची घोर निराशा झाली आहे, असे मत नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!