मुंबई : अभिनेता राजकुमार राव (Rajkumar Rao) ११ वर्षे डेट (dating) केल्यानंतर अभिनेत्री पत्रलेखाशी (Patralekha) नोव्हेंबर २०२१ मध्ये विवाहबंधनात अडकला. सोशल मीडियावर तो सतत सक्रिय असून त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर केले होते. नुकतच त्यांच्या लग्नानंतरच्या (Married) आयुष्याबद्दल काही खुलासे केले आहेत.
दरम्यान राजकुमार रावने एका मुलाखतीत लग्नानंतर आयुष्यातील त्यास आलेल्या अनुभवाचे कथन केले आहे. गोष्टी शेअर करतांना तो म्हणाला की, “पत्रलेखाशी लग्न केल्यानंतर मला खूप छान वाटत आहे. ती माझी सर्वात चांगली मैत्रीण, माझे प्रेम, माझे कुटुंब आणि माझे सर्व काही आहे.”
तसेच “आम्ही लिव्ह इन मध्ये राहत असताना फार कमी दिवस एकत्र असायचो. शूटींगमुळे मी अनेकदा बाहेर असायचो आणि तीसुद्धा तिच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. मात्र लॉकडाऊनमुळे गेली दोन वर्षे आम्ही एकत्र राहिलो. आम्हाला एकत्र राहण्यासाठी वेळ मिळाला आणि त्यावेळी आमच्या हे लक्षात आले की आपण आपले उर्वरित आयुष्य एकत्र घालवू शकतो. त्यानंतर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचं ही सांगितलं.
![]()
“मला आता पूर्ण झाल्यासारखे वाटत आहे. मी आणि पत्रलेखा सध्या पती-पत्नी बनण्याचा सराव करत आहोत. यापुढे राजकुमार म्हणाला की, “११ वर्षे एकत्र राहूनही आम्ही अद्याप तसेच आहोत. आमच्यात काहीही बदल झालेला नाही. अनेक नात्यात पहिल्या दुसऱ्या वर्षातच बोलण्याची इच्छा कमी होते. पण आमच्या बाबतीत हे सर्वकाही उलट झाले आहे. आमचा एकमेकांशी बोलण्याचा वेळ वाढत आहे. त्यामुळे आमच्यात काहीही कमी झालेले नाही.” असं ही राजकुमारने व्यक्त केले. तसेच १५ नोव्हेंबर २०२१ रोजी ते लग्न बंधनात अडकले असून आता वैवाहिक आयुष्य उत्तमरित्या जगत असल्याची भावना ही व्यक्त केली.
महत्वाच्या बातम्या:
कन्हैय्या कुमारवर फेकली शाई; अॅसिड असल्याचा काँग्रेसचा दावा
रिंकू राजगुरू गेली ‘या’ अभिनेत्यासोबत डिनर डेटला, अफेअरची जोरदार चर्चा
‘शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना उभारी देणारा अर्थसंकल्प’; गिरीश महाजन यांचे वक्तव्यं
‘नव्या बाटलीत जुने पेय म्हणजे केंद्रीय अर्थसंकल्प’; सुभाष देसाई यांचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

