Share

‘धक्का बुक्की नही करणेका, टपाटप, टपाटप…’; रुपाली पाटलांचा हिंदुस्तानी भाऊवर पुन्हा एकदा निशाणा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: दहावी-बारावी विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत अफवा पसरवणाऱ्या हिंदुस्तानी भाऊ (Hindustani Bhau) ऊर्फ विकास पाठक विरोधात (Vikas Phathak) धारावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे. आज हिंदुस्थानी भाऊला बांद्रा कोर्टात हजर करण्याची शक्यता आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भडकाऊ भाईजानला फटकावला असेल चांगला, अशी प्रतिक्रिया रुपाली पाटलांनी ट्विट करत दिली.

रुपाली पाटील (Rupali Thombre Patil) ट्विटमध्ये म्हणतात, ‘विकास फाटक फटकवला असेल चांगला ? कुणी कायदा मोडेल तर महाराष्ट्र पोलीस त्याला कस सोडेल? “भडकाऊ भाईजान”, असे रुपाली पाटील ट्विट करत म्हणाल्या होत्या. ३१ जानेवारी रोजी युट्युबर विकास फाटक उर्फ हिंदुस्तानी भाऊने परीक्षेबाबत अफवा पसरवल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांनी मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद अशा वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन केली. विद्यार्थ्यांच्या या गोंधळामुळे बराच वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांना विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला होता. तर दुसरीकडे विद्यार्थ्यांनी परीक्षा ऑनलाईन व्हाव्यात म्हणून आंदोलन केले होते.

आता पुन्हा एकदा रुपाली ठोंबरे पाटील यांनी ट्विट करत हिंदुस्तानी भाऊला टोला लगावला आहे. हिंदुस्तानी भाऊची बोलण्याची एक पद्धत आहे. काही ठराविक शब्द असो किंवा काही वाक्य हे त्याने बोललेल्या पद्धतीमुळे देखील त्याला अनेकजण ओळखतात. त्याचे काही ठराविक शब्द म्हणजे ‘टापाटप’, ‘रुको जरा’, असे काही शब्द तो नेहमी वापरतो. त्याच्याच भाषेत आता रुपाली ठोंबरे पाटील यांनी त्याला टोला लगावला आहे. धक्का बुक्की नही करणेका, टपाटप, टपाटप, टपाटप, रुको जरा, असं म्हणत हॅश टॅग कोठडीत असं पाटील यांनी ट्विट केले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!