Share

विराट कोहली, ऋषभ पंत आणि व्यंकटेश अय्यरची धुवदार फलंदाजी ; भारताचे वेस्टइंडीज समोर १८७ धावांचे लक्ष

Published On: 

कोलकत्ता : क्रिकेट प्रेमी ज्या क्षणाची गेले कित्येक कालावधी वाट पाहत होते त्याची अखेर आज झाली आहे. विराट कोहली याने जबरदस्त आणि आक्रमक फलंदाजी करत ४१ चेंडूत ५२ धावा केल्या आहेत. भारताच्या डावामध्ये आधी विराट कोहलीने आक्रमक फलंदाजी केली तर विराट नंतर ऋषभ पंत आणि व्यंकटेश अय्यर या दोघांनी धुवादार फलंदाजी करत भारताचा डाव १८६ पर्यन्त नेला.

भारत आणि वेस्टइंडीज मधील दुसऱ्या टी-२० सामन्यात वेस्टइंडीज संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विराट कोहलीने सुरवातीपासूनच आक्रमक फलंदाजी करत ४१ चेंडूत ५२ धावा केल्या. या त्याच्या ५२ धावांच्या तडाखेबाज डावात ७ चौकार आणि १ षटकार होता. तर भारताचा डाव संपत असताना ऋषभ पंतने आक्रमक फलंदाजी करत ७ चौकार आणि १ षटकारासह २८ चेंडूत ५२ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या व्यंकटेश अय्यरने १ षटकार आणि ४ चौकारासह १८ चेंडूत ३४ धावा केल्या आणि वेस्टइंडीज संघाला १८७ धावांचे तगडे आवाहन दिले आहे.

वेस्टइंडीज संघाकडून रोस्टन चेसने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर शेफर्ड आणि कॉट्रेल यांनी 1-1 विकेट घेतली. भारत विरुद्ध वेस्टइंडीज संघात ३ टी-२० सामन्यांची मालिका होणार असून, तिन्ही सामने कोलकत्ता येथील ऐतिहासिक इडन गार्डनवर खेळवण्यात येणार आहेत. भारताने वेस्टइंडीज विरुद्धच्या ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना जिंकून १-० अशी आघाडी घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या :   

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!