Share

आपलाच मुलगा उमेदवार आहे, हेच विसरले मुलायम सिंह यादव

Published On: 

लखनऊ : सध्या देशभरात विधानसभेच्या निवडणुकांचा प्रचार मोठया प्रमाणात सुरु आहे. पंजाब,उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि उत्तरप्रदेश या पाच राज्यात निवडणुका होणार आहेत. गोवा आणि उत्तराखंड या दोन राज्यात निवडणूका झाल्या आहेत. तर इतर ३ राज्यात निवडणूका होणार आहेत. सगळ्या देशाचे लक्ष उत्तरप्रदेशमधील विधानसभेच्या  निवडणुकीकडे लागले आहे. उत्तरप्रदेशमध्ये पण आगामी विधानसभा निवडणूकीकरता जोरदार प्रचार चालू आहे. सगळेच पक्ष आपल्या पक्षाच्या उमेद्वाराकरता निवडणुकांचा प्रचार करत आहेत.

आज समाजवादी पक्षाचे माजी अध्यक्ष मुलायम सिंह यादव हे उत्तरप्रदेश निवडणूकीकरता प्रचाराला आले होते. त्यांनी आज त्यांचा मुलगा  अखिलेश यादव करता प्रचार केला; मात्र हा प्रचार करत असताना ते अखिलेशच इथल्या मतदारसंघाचे उमेद्वार आहेत हे विसरले.  उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव त्यांचा मुलगा आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या प्रचारासाठी करहलला पोहोचले होते. यावेळी त्यांना अखिलेश यादव येथून निवडणूक लढवत असल्याचे माहीतच नव्हते. त्यामुळे या जागेवरून जो कोणी निवडणूक लढवतो. त्याला मतदान करा, असं आवाहन त्यांनी यावेळी केले. मात्र तिथे उपस्थित असणाऱ्या समाजवादी पक्षाच्या नेत्याने तुमचाच मुलगा येथून निवडणूक लढवत आहे असे सांगितल्यावर अखिलेश यादव यांना प्रचंड मताने विजयी करा असे मुलायम सिंह यांनी नंतर आवाहन केले.

अखिलेश यादव करहल विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. भाजपने केंद्रीय मंत्री एसपी सिंह बघेल यांना  करहल विधानसभा मतदार संघातून उमेद्वारी दिली आहे. करहल विधानसभा मतदार संघात  २० फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर निकाल १० मार्च रोजी निकाल जाहीर होणार आहेत.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!