Share

बाबर आझम सोबतच्या वादाबद्दल वसीम अक्रमने केला खुलासा म्हणाला…

Published On: 

मुंबई: पाकिस्तानचा टी २० संघाचा कर्णधार बाबर आझम सध्या चालू असलेल्या पाकिस्तान सुपर लीग २०२२ मध्ये कराची किंग्ज संघाचा कर्णधार म्हणून कठीण परिस्थितीतून जात आहे. बाबरचा संघ कराची किंग्जने पाकिस्तानच्या लीगमध्ये लागोपाठ आठ सामने गमावले आहेत आणि ते आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. याच दरम्यान एका सामन्यात वसीम अक्रम आणि बाबर यांच्यात मैदानावरच वाद होताना दिसला. त्याचा व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाला आहे.

पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि क्रिकेट दिग्गज वसीम अक्रम हा कराची किंग्ज फ्रँचायझीचा अध्यक्ष आहे आणि लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर नुकत्याच झालेल्या पीएसएलमध्ये मुलतान सुलतान्स विरुद्ध झालेल्या सामन्यात तो बाबर आझमला रागवताना दिसला. सोशल मीडियावर त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वसीमने ट्विटरद्वारे घटनेबाबत खुलासा केला आहे. त्याने लिहले “नमस्कार ! काल रात्री बाऊंड्रीवर बाबरशी बोलल्याबद्दलच्या प्रतिक्रिया पाहून आश्चर्य वाटले. मी तेव्हा त्याला सांगत होतो कि ‘आमचे गोलंदाज ऑफसाइडला यॉर्कर का टाकत नाहीत किंवा स्लोअर्स का टाकत नाहीत’.बाकी जास्त काही नाही. बाबर हा अप्रतिम मुलगा आहे आणि त्याने सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. आणि रात्रीच्या जेवणासाठी त्याला काय हवे आहे”

पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक सकलेन मुश्ताक यांनी पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऐतिहासिक घरच्या मालिकेपूर्वी कर्णधार बाबर आझमच्या नेतृत्वाचे समर्थन केले आहे. पाकिस्तान सुपर लीगमध्ये बाबरच्या कर्णधारपदात कराची किंग्जने सलग आठ सामने गमावले आहेत. २०२०चे चॅम्पियन यावर्षी प्लेऑफसाठी स्पर्धेबाहेर पडले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!