मुंबई: मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवा या सहाव्या मार्गिकेचं काम पूर्ण झालं असून त्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज होणार आहे. त्यासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे देखील उपस्थित राहणार आहेत. त्याच सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वेमंत्र्यांनी आज ठाणे ते दिवा असा लोकल प्रवास केला. यावेळी त्यांच्यासोबत रावसाहेब दानवे देखील होते. ठाण्यापासून दिव्यापर्यंत त्यांनी प्रवास केला.
यावेळी सामान्य लोकांप्रमाणेच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तसेच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी लोकलमध्ये प्रवास केला. अश्विनी वैष्णव आणि दानवे त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत आणि कर्मचाऱ्यांसोबत लोकलच्या डब्यात चढल्यानंतर दोघांनी उभं राहूनच प्रवास केला. तसेच यावेळी त्यांनी एका हॉटेलमध्ये वडापाव आणि भज्यांवर देखील चांगलाच ताव मारला आहे.
महत्वाच्या बातम्या:
“तो माझ्या घरी येणे अविस्मरणीय क्षण होता’; मोहम्मद सिराजचा खुलासा
“मुख्यमंत्री ठाकरेंनी खुर्ची वाचवण्यासाठी पत्नीशी गद्दारी केली?”, सोमय्यांचा सवाल
किरीट सोमय्या कोर्लईत येताच तणाव, शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने
“….पुरावे असतात तेव्हा वाझे आणि अनिल देशमुख होतो”, भातखळकरांचा संजय राऊतांना टोला
राष्ट्रवादी काँग्रेस हा पश्चिम महाराष्ट्रापुरता पक्ष; गिरीश बापटांची खोचक टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

