Share

IND vs WI: पर्दापणाच्या सामन्यातच रवी बिष्णोई ठरला “मॅन ऑफ द मॅच’

Published On: 

मुंबई : भारताच्या वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने वेस्ट इंडीजवर ६ विकेट्सने विजय मिळवला. ज्यात पर्दापणाच्या पहिल्या सामन्यात रवी बिष्णोई या युवा खेळाडूने २ विकेट्स पटकावल्या आहेत. सोबतच तो मॅन ऑफ द मॅचही ठरला आहे. पहिल्याच सामन्यात सामनावीर ठरणारा बिश्नोई ७वा खेळाडू ठरला आहे.

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील ईडन गार्डन्स, कोलकाता येथे झालेल्या तीन सामन्यांच्या T20I मालिकेतील पहिल्या सामन्यात रवी बिश्नोईने आंतरराष्ट्रीय T20 मध्ये पदार्पण केले. बिश्नोईला त्याची पदार्पण कॅप वरिष्ठ लेग-स्पिनर युझवेंद्र चहलकडून मिळाली.बिश्नोईंने त्याच्या पर्दापणाच्या सामन्यातच अप्रतिम कामगिरी केली. ४ ओव्हरमध्ये रवीने फक्त १७ धावा दिल्या आणि त्याने वेस्ट इंडिजच्या दोन फलंदाजांना बाद केले आहे.

बिष्णोईच्या सनसनाटी कामगिरीसाठी ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार जिंकल्यानंतर रवी बिश्नोई म्हणाला की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणे हे त्याचे स्वप्न होते. “आता भारी वाटत आहे. भारतासाठी खेळणे हे एक स्वप्न होते आता ते पूर्ण झालेय. मी सुरुवातीला घाबरलो होतो पण मला संघासाठी योगदान द्यायचे होते कारण आम्हाला माहित आहे की वेस्ट इंडिज हा T20 क्रिकेटमधील सर्वात मजबूत संघांपैकी एक आहे.”तो पुढे म्हणाला की त्याच्या T20I पदार्पणात ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार जिंकण्याचा त्याने कधीही विचार केला नाही आणि तो त्याच्यासाठी स्वप्नपूर्तीचा क्षण असल्याचेही तो म्हणाला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!