मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या(Kirit Somaiya) यांनी गंभीर आरोप लावले आहेत. वाईन व्यवसाय, तसेच पुण्यातील जम्बो कोविड घोटाळा यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) आणि संजय राऊतांचे निकटवर्तीय यांना निशाण्यावर धरले आहे. यालाच उत्तर देत राऊतांनी १५ फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेतली. परंतु तद्पश्चात भाजप नेत्यांकडून राऊतांवर टीकास्त्रांचा वर्षाव करण्यात आला. दररम्यान, याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी एक सूचक ट्विट केले आहे.
आपल्या ट्विटमध्ये संजय राऊत म्हणाले आहेत की,‘मेरा यही अंदाज ज़माने को खलता है, कि चिराग हवा के खिलाफ क्यों जलता है’, असे सूचक ट्विट राऊत यांनी केले आहे. दरम्यान, १५ फेब्रुवारीच्या पत्रकार परिषदेपूर्वी देखील राऊतांनी एक ट्विट केले होते ज्यामध्ये ते म्हणाले होते की,‘शाख़ों से टूट जाएँ वो पत्ते नहीं हैं हम, आँधी से कोई कह दे कि औक़ात में रहे’, असे ते म्हणाले होते.
मेरा यही अंदाज ज़माने को खलता है,
कि चिराग हवा के खिलाफ क्यों जलता है… pic.twitter.com/l3yarbD78R— Sanjay Raut (@rautsanjay61) February 17, 2022
दरम्यान, राऊत यांच्या या ट्विटवर टीका करत भाजप आमदार प्रसाद लाड म्हणाले होते की,‘आँधी से मत लढ़ना औकात मै रहना, आँधी जब आती है तब क्या-क्या लेके जाती है, हे त्याला माहित नाही. मी त्यांना विनंती करतो की जर तुम्ही आम्हाला आँधी म्हणत असाल तर आमच्यापासून घाबरून रहा,’असे लाड म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या:
“रैनाने धोनीचा विश्वास गमावला”; विदेशी खेळाडूचे मोठे वक्तव्य
इम्रान खान यांच्या तोंडी पावले पुढे-मागे घेण्याची भाषा शोभते तरी का?- संजय राऊत
रात्री 12 शिवछत्रपतींच्या स्मारकाचे उद्घाटन, त्यात ही निर्बंध; मग पत्रकार परिषदेला गर्दी कशी चालते?
नितीन गडकरींकडून आश्वासनांचा पाऊस; म्हणाले,“लवकरच हवेत उडणाऱ्या बस…”
“बीड जिल्ह्यात मुलींच्या जन्मदरात घट; यावर कुणाचाही वचक राहिला नाही”, पंकजा मुंडेंचा संताप


