Share

“…म्हणून आम्ही काँग्रेस सोडली”, निलेश राणेंचा मोठा खुलासा

Published On: 

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्रकार परिषदेनंतर काल(१६ फेब्रु.)केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) आणि संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले. तद्पश्चात शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर(Milind Narvekar) यांनी ट्विट करत नारायण राणेंना जोरदार टोला लगावला. यानंतर नारायण राणे आणि मिलिंद नार्वेकर यांच्यात ट्विटर वॉर बघायला मिळाला. याच पार्श्वभूमीवर आता भाजप नेते निलेश राणे(Nilesh Rane) यांनी मिलींद नार्वेकरांचा समाचार घेत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. तसेच अशोक चव्हाण यांच्या कारस्थानांमुळे काँग्रेस सोडल्याचा मोठा खुलासाही यावेळी निलेश यांनी केला आहे.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना निलेश राणे म्हणाले की,‘आमच्या विरोधात अशोक चव्हाण चुकीची फिल्डिंग दिल्लीत लावत होते, म्हणून कंटाळून आम्ही काँग्रेस सोडली.’ तसेच अशोक चव्हाण तेव्हा तसे वागले नसते, तर तो निर्णय घेतला नसता, असे राणे यावेळी म्हणाले.

दरम्यान, पुढे नार्वेकरांवर निशाणा साधत ते म्हणाले की,‘मिलिंद नार्वेकर यांना बसायला जागा नसायची.ते मागे उभे असायचे. शिवसेनेत तिकिट विकणारा जर कोण एजंट असेल तर तो मिलिंद नार्वेकर’, असे म्हणत निलेश राणेंनी नार्वेकरांवर टीका केली.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!