मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यात ट्वीटर युद्ध सुरु झाले. राणेंनी मुख्यमंत्री ठाकरेंवर गंभीर आरोप केले. तर त्यानंतर नार्वेकरांनीही राणेंना स्वतःच्या मेडिकल कॉलेजसाठी साहेबांकडून परवानगी मिळावी म्हणून दिवसभरात सात वेळा फोन करून विनंत्या केल्याचं विसरलात? असा टोला लगावला. आता या वादात भाजप नेते निलेश राणे (BJP leader Nilesh Rane) यांनीही उडी घेतली आहे.
“स्व. बाळासाहेबांनी विनायक राऊत (Vinayak Raut) व मिलिंद नार्वेकरला (Milind Narvekar) काडीची किंमत दिली नाही, साध राज्यमंत्री सुद्धा केलं नाही. उद्धव ठाकरेंकडे चाटूगिरी करून सुद्धा उद्धव ठाकरेंनी पण या दोघांना राज्यमंत्री केलं नाही. मिलिंद (चप्रासी) नार्वेकर हिम्मत असेल तर कधी निवडणुकी मध्ये उभा राहून दाखव.”, असे आव्हान निलेश राणे यांनी दिले आहे.
स्व. बाळासाहेबांनी विनायक राऊत व मिलिंद नार्वेकरला काडीची किंमत दिली नाही, साध राज्यमंत्री सुद्धा केलं नाही. उद्धव ठाकरेकडे चाटूगिरी करून सुद्धा उद्धव ठाकरेनी पण या दोघांना राज्यमंत्री केलं नाही. मिलिंद (चप्रासी) नार्वेकर हिम्मत असेल तर कधी निवडणुकी मध्ये उभा राहून दाखव.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) February 16, 2022
दरम्यान संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजपकडून बऱ्याच प्रतिक्रिया उमटल्या. ईडीच्या अधिकाऱ्यांवर संजय राऊत यांनी आरोप केले. यावर नारायण राणे म्हणाले, “ईडीच्या अधिकाऱ्याने ३०० कोटी घेतल्याचा आरोप राऊतांनी केला. ईडी अधिकाऱ्यांनी गप्प बसू नये, संजय राऊतांना उचलून न्यावे, थोडी पुजा करावी आणि पुरावे मागावे. नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यावर टीका करताय, तुमची काय लायकी आहे, तुम्ही कुठे आहात?”
महत्वाच्या बातम्या:
- “रैनाने धोनीचा विश्वास गमावला”; विदेशी खेळाडूचे मोठे वक्तव्य
- “बीड जिल्ह्यात मुलींच्या जन्मदरात घट; यावर कुणाचाही वचक राहिला नाही”, पंकजा मुंडेंचा संताप
- नितीन गडकरींकडून आश्वासनांचा पाऊस; म्हणाले,“लवकरच हवेत उडणाऱ्या बस…”
- रात्री 12 शिवछत्रपतींच्या स्मारकाचे उद्घाटन, त्यात ही निर्बंध; मग पत्रकार परिषदेला गर्दी कशी चालते?
- इम्रान खान यांच्या तोंडी पावले पुढे-मागे घेण्याची भाषा शोभते तरी का?- संजय राऊत


