Share

… आणि विराटच्या शब्दावर रोहितने रिव्ह्यू घेतला

Published On: 

मुंबई : भारताच्या वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली मैदानावरील मनोरंजक संभाषण करताना दिसले. मैदानावर प्रेक्षकांची संख्या कमी असल्याने, स्टंप माइकमध्ये सगळे बोलणे स्पष्टपणे ऐकू येत होते. तेव्हाच एक अपील झाली आणि रोहित विराटशी रिव्ह्यू घ्यावा कि नाही यावर चर्चा करताना दिसला.

ही घटना ८ व्या ओव्हरमध्ये घडली. ती विकेट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील रवी बिश्नोईची पहिलीच होती. त्याने एक गुगली टाकली जी लेग साइडच्या खाली फिरली आणि पंतने झेल घेतला आणि बेल्स उडवल्या. आवाज आल्याने लेग-स्पिनरने अपील केले आणि इतर खेळाडूंनीही केले, परंतु मैदानावरील पंच जयरामन मदनगोपाल यांनी वाइडचा संकेत दिला. यावेळेस रोहित अंपायरला ” वाईड किधर दे रहा है यार” बोलताना दिसला. विराट कोहली आणि पंतने रोहितला रिव्ह्यू घेण्यास सांगितले.

https://twitter.com/im_maqbool/status/1493954869409247236?s=20&t=GLn2Vi6JA5i926iAwKQGIQ

विराटने रोहितला ” मैं बोल रहा हूँ , तु रिव्ह्यू ले’ आणि दुसऱ्याच क्षणाला रोहितने विराटाचे ऐकत रिव्ह्यू घेतले. टीव्ही रिप्लेने दाखवले की तो झेल नव्हता किंवा यष्टीचीतही झाला नाही. पंतकडे जाण्यापूर्वी बॉल बॅटरच्या पॅडला घासले गेले होते. अंपायरने वाइड बॉलचा निर्णय उलटवला, पण रोहितने रिव्हियूचे संकेत देण्यापूर्वी टीव्ही अंपायरने ऑन-फिल्ड अंपायरच्या कॉलवर प्रतिक्रिया दिल्याने भारताने रिव्ह्यू गमावला नाही.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!