Share

मुख्यमंत्री ठाकरेंकडून के. चंद्रशेखर राव यांना भोजनाचे निमंत्रण; राजकीय हालचालींना वेग

Published On: 

मुंबई: तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (Telangana Chief Minister K. Chandrashekhar Rao) रविवारी मुंबईत येणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी त्यांना भोजनाचे आमंत्रण दिले आहे. तसेच या भेटीत समविचारी पक्षांना संघटित करतानाच पुढील दिशा निश्चित करण्यासाठी यांच्यात चर्चा होणार आहे. याबाबत तेलंगणच्या मुख्यमंत्री कार्यालयातून माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान मंगळवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद झाली. त्याचदिवशी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिल्ली वारी केली. तर लगेच दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा करत भेटीला येण्याचे निमंत्रण दिले. त्यामुळे राजकारणात मोठ्या हालचाली घडताना सध्या दिसून येत आहे.

काही दिवसांपूर्वी राव यांनी पाकिस्तानवर करण्यात आलेल्या कारवाईच्या पुराव्याची मागणी केली होती. दरम्यान बिगर- भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची लवकरच नवी दिल्लीत बैठक होणार आहे. यासाठी मुख्यमंत्री ठाकरेंनीही सहमती दर्शवली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी, तमिळनाडूचे स्टॅलिन, तेलंगणचे चंद्रशेखर राव या प्रादेशिक पक्षांच्या मुख्यमंत्र्यांची एकजूट होण्याची चित्रे सध्या दिसून येत आहे. त्यामुळे राज्यातील तसेच देशातील राजकारणाला चांगलाच वेग आल्याचे दिसते आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!