Share

Devendra Fadnavis : “सगळा अभ्यास आदित्य ठाकरेंनीच केलाय असे नाही”; मेट्रो कारशेड प्रकरणावरून फडणवीसांचा टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात शिंदे आणि फडणवीस सरकार येताच मेट्रो 3 कारशेड आरेमध्येच उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर राज्य सरकारच्या या निर्णयाबाबत ‘आरे वाचवा’ या चळवळीतील सदस्यांनी, पर्यावरणप्रेमींनी आणि आरेवासीयांनी शिंदे सरकारच्या विरोधात आंदोलन केले होते. मात्र आता पुन्हा एकदा ठाकरे सरकारच्या काळात स्थगिती देण्यात आलेल्या मुंबईच्या आरे परिसरातील मेट्रो कारशेडच्या कामावरील बंदी उठवण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

याआधी सुरवातीला मेट्रो कारशेडसाठी फडणवीस सरकारने आरेच्या जागेवर कामाला सुरुवात केली होती. मात्र कारशेडच्या कामावरील स्थगिती उठवल्याने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरेंना हा मोठा झटका मानला जातोय. याबाबत फडणवीस यांना विचारलं असता, सगळ्या अभ्यास आदित्य ठाकरे यांनीच केलाय असं नाही. ते पर्यावरण मंत्री होते. पण त्यांनी अभ्यास केला असा होत नाही. या कारशेडचा सर्व अभ्यास झाला आहे. मिठी नदीची एवढी होती तर तुमच्या काळात नदी काठी अनधिकृत बांधकामे कशी झाली. बांधकामांना परवानग्याही दिल्या, असा टोला फडणवीस यांनी लगावलाय.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्याकडून आरे कारशेडवरील बंदी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात शिवसेना- भाजप युती सरकारच्या काळात मेट्रो-३ चे कारशेड आरेमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार कारशेडचे २५ टक्के कामही पूर्ण झाले होते. मात्र, नोव्हेंबर २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येताच उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच दिवशी आरे कारशेडच्या कामाला स्थगिती दिली. मात्र येत्या दोन वर्षात हा प्रकल्प मार्गी लावणार असल्याचे महायुती सरकारनं सांगितलं. मुंबईकरांचा प्रवास सुखाचा व्हावा असा प्रयत्न जरी होत असला तरी काही संघटना आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!