नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. पहिल्या सामन्याला आजपासून सुरुवात झाली. पहिल्या सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या दिवसखेर ६ बाद ३५७ धावा केल्या.
भारताच्या सलामीवीर जोडीने संघाला चांगली सुरुवात करून दिली. परंतु कर्णधार रोहित शर्मा लाहिरू कुमाराच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात लकमलला झेल देऊन बसला. त्याने २८ चेंडूत २९ धावा केल्या. मयंक अगरवालही ३३ धावा करून बाद झाला. त्यानंतर हनुमा विहारी आणि विराट कोहली यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु संघाची १७० धावसंख्या असताना विराट ४५ धावांवर बाद झाला.
त्यानंतर हनुमा विहारीही संघाची १७५ धावसंख्या असताना बाद झाला. त्याने या सामन्यात अर्धशतक करत ५८ धावा केल्या. तर श्रेयस अय्यरने २७ धावांचे योगदान दिले. चांगल्या लयमध्ये असणारा रिषभ पंत लकमलच्या चेंडूवर ९६ धावांवर त्रिफळाचीत झाला.
तर रवींद्र जडेजा ४५ व आर अश्विन १० धावांवर नाबाद आहेत. श्रीलंकेकडून एम्बुलदेनिया याने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तर लकमल, फर्नांडो, लाहिरू कुमारा, आणि धनंजया डीसिल्वा यांनी प्रत्येकी १ विकेट्स घेतल्या.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

