मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असा सूचक इशारा दिला आहे. या चर्चेतून दृश्यफळे लवकरच पाहायला मिळतील असेही सांगितले.
संजय राऊत यांनी पहिल्यांदा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली. या दोन भेटीनंतर संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. संवाद साधताना हा सूचक इशारा दिला. नवाब मालिकांना भेटणे हे आमचे कर्तव्य आहे. ते महाविकास आघाडीचे सहकारी आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांनी त्यांना अटक केलेली किती बोगस आणि खोटी आहे, हे कोर्टात सिद्ध झाले आहे. असेही संजय राऊत म्हणाले. तसेच त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी आम्ही आलो आहे. नवाब मालीकांसोबत मुखमंत्री आहेत, सर्वजण त्यांच्यासोबत आहेत. असे माध्यमाशी बोलताना सांगितले.
नवाब मलीकांच्या विरोधात विरोधकांनी मोर्चा काढला होता त्यावरही संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून राज्य सरकारांना बदनाम करायचे, कामामध्ये अडथळे आणायचे तसेच राज्य पाल्यांच्या खांद्यावर बंदुका ठेवायच्या असे करून आपण पुन्हा सत्तेवर येऊ असे वाटत असेल तर ती लोक अंधारात चाचपडत आहेत असे बोलून संजय राऊत यांनी टोला लगावला.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

