मुंबई: भाजपा किसान मोर्चाच्या वतीने शेतकऱ्यांच्या समस्या घेऊन विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे उपस्थित होते. यावेळी फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढले आहे. मोर्चातील सहभागी लोकांकडे इशारा करत फडणवीस म्हणाले की ‘तूमची किती दहशत आहे बघा.. आज विधानभवनावर मोर्चा येणार हे माहित असल्याने विधानसभा तहकुब करून सरकार पळून गेले’. आम्हाला सरकारपुढे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायचे होते परंतु सरकारकडे या प्रश्नांची उत्तरे नव्हती म्हणून सरकार दोन दिवसांसाठी पळून गेले, असा आरोप देखील फडणवीसांनी केला.
या सरकारचे नाव महावसुली सरकार ठेवाला हवे. आम्ही कधीही शेतकऱ्यांची वीज तोडली नाही, परंतु आता ऊर्जामंत्र्यांनी स्वतः घोषणा केली आहे की, आता आम्ही स्थगिती हटवून वीज तोडणी सुरू करणार आहोत. आम्ही कधीही वीजबिल भरण्याची सक्ती केली नाही तसेच ट्रन्सफॉर्मर बंद पडण्यास ट्रन्सफॉर्मर बदलूनही दिले आहेत, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.
प्रवीण दरेकरांचा इशारा
२०२२ चे अर्थसंकल्पीय अधिवेशन नवाब मलिक यांचा राजीनामा तसेच ओबीसी आरक्षण या मुद्द्यांवरून चांगलेच गाजत आहे. सलग दुसऱ्या दिवशीही भाजपने ओबीसी आरक्षण संदर्भात मविआ सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी ओबीसी आरक्षण व निवडणुक संदर्भात सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली आहे.
“ओबीसी आरक्षणासंदर्भात सरकार वेळकाढूपणा करीत आहे. या सरकारने ओबीसी आरक्षणाची जवळपास हत्या केली आहे. सरकारने ओबीसी आरक्षणासंदर्भात आपली भूमिका जाहीर करावी, ओबीसींचे राजकीय आरक्षण दिल्याशिवाय निवडणूका घेऊ नयेत”, अशी मागणी दरेकर यांनी सभागृहात लावून धरली.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

