मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) संपल्यानंतर आता पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा हंगाम सुरू होत आहे. यामध्ये भारतीय संघाचे वेळापत्रक दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND vs SA) मायदेशातील मालिकेसंदर्भात असेल. जूनमध्ये होणाऱ्या या मालिकेसाठी भारतीय संघ आधीच जाहीर झाला आहे.
दक्षिण आफ्रिका संघ भारत दौऱ्यावर टी-२० मालिकेसाठी येत आहे. उभय संघांमध्ये पाच टी-२० सामन्यांची मालिका होईल. या मालिकेची सुरुवात ९ जून रोजी पहिल्या टी-२० सामन्याने होणार आहे. अंतिम सामना १९ जून रोजी होणार आहे. आयपीएलमध्ये खेळाडू बायो बबलमध्ये होते, परंतु बीसीसीआयने बायो बबल हटवले आहे.
https://twitter.com/sportstigerapp/status/1530830610381479936
टी-२० मालिका
- ९ जून, पहिला टी-२० सामना (अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली)
- १२ जून, दुसरा टी-२० सामना (बाराबाती स्टेडियम, कटक)
- १४ जून, तिसरा टी-२० सामना (डॉ. YSR रेड्डी स्टेडियम, विशाखापट्टणम)
- १७ जून, चौथा टी-२० सामना (सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, राजकोट)
- १९ जून, पाचवा टी-२० सामना (एम चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू)
दोन्ही संघ
भारत : केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक) दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.
दक्षिण आफ्रिका : टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रिझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्किया, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, कगिसो रबाडा, तबरेझ शम्सी, सेंट ट्रायव्हन. डर डुसेन, मार्को जानसेन.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

