Share

IPL 2022 Final : मॅचदरम्यान जोस बटलरनं रागाच्या भरात केलं ‘असं’ कृत्य; VIDEO होतोय व्हायरल!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)चा अंतिम सामना गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. गुजरातने पदार्पणाच्या मोसमात विजेतेपद पटकावून राजस्थान संघाच्या इतिहासाची पुनरावृत्ती केली. शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सने २००८ मध्ये आयपीएलच्या पदार्पणाच्या मोसमात विजेतेपद पटकावण्याचा पराक्रम केला होता. यावेळीही राजस्थान चॅम्पियन होईल अशी चाहत्यांची अपेक्षा होती. पण, गुजरातने त्यांच्या आशा पल्लवित केल्या. राजस्थानच्या पराभवाचे एक कारण म्हणजे अंतिम फेरीतील जोस बटलरचे अपयश. संपूर्ण मोसमात षटकार आणि शतके झळकावणाऱ्या बटलरला अंतिम फेरीत मोठी खेळी करता आली नाही आणि त्याचा फटका संघाला पराभवाच्या रूपाने सहन करावा लागला.

बटलर आणि यशस्वी जयस्वाल यांच्यावर राजस्थानला दणदणीत विजय मिळवून देण्याची जबाबदारी होती. या जोडीने संथ सुरुवात केली. पण, यशस्वी बाद होताच बटलरवर धावगती वाढवण्याचे दडपण आले आणि वेगवान धावा करण्याच्या नादात बटलर गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याच्या चेंडूवर झेलबाद झाला. बटलरने ३९ धावा केल्या.

https://twitter.com/credbounty/status/1530938596211195904?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1530938596211195904%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.crictracker.com%2Fgt-vs-rr-devastated-jos-buttler-throws-helmet-gloves-after-getting-dismissed-in-ipl-2022-final%2F

राजस्थान संघाला त्याच्याकडून किती अपेक्षा आहेत, हे बटलरलाही माहीत होते. ड्रेसिंग रूमकडे परतत असताना तो निराश आणि संतप्त दिसत होता. रागाच्या भरात त्याने हेल्मेट आणि ग्लोव्ह्ज फेकून दिले. त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. बटलर बाद होताच राजस्थानचा डाव पूर्णपणे कोलमडला आणि संजू सॅमसनच्या सेनेला २० षटकांत केवळ १३० धावा करता आल्या. गुजरातने हे लक्ष्य ७ गडी गमावून पूर्ण केले.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!