मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) संपल्यानंतर, टीम इंडिया दक्षिण आफ्रिका (IND vs SA) विरुद्ध टी-20 मालिका खेळणार आहे. ९ जूनपासून सुरू होणाऱ्या या मालिकेचा प्रोमो नुकताच लाँच करण्यात आला आहे, या प्रोमोमध्ये बॉलिवूड स्टार आमिर खान आहे. या मालिकेद्वारे टीम इंडियाची वर्ल्ड रेकॉर्डवर नजर आहे. आमिर खाननेही या रेकॉर्डवर नजर टाकली आहे.
या मालिकेपूर्वी टीम इंडियाने सलग १२ टी-२० सामने जिंकले आहेत, जर भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला सामना जिंकला तर हा सलग १३वा विजय असेल. स्टार स्पोर्ट्सने जाहीर केलेल्या प्रोमोमध्ये आमिर खान म्हणतो, “जिंकणे कठीण आहे, सलग १२ टी-२० जिंकणे आणखी कठीण आहे.” आमच्या खेळाडूंच्या टी-शर्टवरील माती त्याची कथा सांगते.”
It's time for #TeamIndia to ✍️ a new chapter in their cricketing legacy & #ChaseTheRecord vs ????????
Send your wishes for ???????? if you also #BelieveInBlue, just like #AamirKhan does!@AKPPL_Official | Paytm T20I Trophy #INDvSA | Starts June 9, 7PM | Star Sports Network & Disney+Hotstar pic.twitter.com/EMnJLVGMmX
— Star Sports (@StarSportsIndia) May 26, 2022
आमिर खान म्हणतो, ”१३वा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आहे, हा केवळ सामना नाही, तर विश्वविक्रम करण्याची संधी आहे. आकाशाएवढी सुंदर माझी निळी जर्सी आकाशाला भिडायला तयार आहे. १३वा सामना जिंकून माझा भारत विश्वविक्रम करेल का? माझा निळ्या रंगावर विश्वास आहे.”
आत्तापर्यंत सर्वाधिक सलग टी-२० सामने जिंकण्याचा विक्रम अफगाणिस्तान, रोमानिया आणि भारत यांच्या नावावर आहे, ज्यांनी संयुक्तपणे सलग १२-१२ सामने जिंकले आहेत. पहिल्या टी-२० सामन्यामध्ये भारताने आफ्रिकेला हरवले तर विश्वविक्रम टीम इंडियाच्या नावे होईल.
भारत-दक्षिण आफ्रिका टी-२० मालिका
- ९ जून, पहिला टी-२० सामना (अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली)
- १२ जून, दुसरा टी-२० सामना (बाराबाती स्टेडियम, कटक)
- १४ जून, तिसरा टी-२० सामना (डॉ. YSR रेड्डी स्टेडियम, विशाखापट्टणम)
- १७ जून, चौथा टी-२० सामना (सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, राजकोट)
- १९ जून, पाचवा टी-२० सामना (एम चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू)
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

