Share

IPL 2022 संपलं आता काय? यंदा होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपपर्यंत ‘असं’ आहे टीम इंडियाचं वेळापत्रक!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) संपल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचे लक्ष आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळण्यावर आहे. टीम इंडियाच्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाचे पुढील सहा महिने खूप व्यस्त आहेत. त्याची सुरुवात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या द्विपक्षीय मालिकेपासून होत आहे. पुढील सहा महिन्यांत भारतीय संघ आशिया कप २०२२, टी-२० विश्वचषक आणि इंग्लंडसह आयर्लंड, वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका खेळणार आहे.

ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी-२० विश्वचषकापूर्वी भारतीय संघ सुमारे २० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळून आपल्या तयारीला ठोस स्वरूप देईल. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया दौऱ्यावर आलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. या मालिकेत टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मासह विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहसारख्या वरिष्ठ खेळाडूंना इंग्लंड दौऱ्याची तयारी पाहता विश्रांती देण्यात आली आहे. इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडिया तीन सराव सामने, ३ एकदिवसीय, ३ टी-२० आणि गेल्या वर्षी पुढे ढकलण्यात आलेला पाचवा कसोटी सामना खेळणार आहे.

भारतीय क्रिकेट संघाचे पुढील वेळापत्रक :-

  • भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका – जून (५ टी-२० सामने)
  • भारताचा आयर्लंड दौरा – जून (२ टी-२० सामने)
  • भारताचा इंग्लंड दौरा – जून/जुलै (१ कसोटी, ३ वनडे आणि ३ टी-२० सामने)
  • भारताचा वेस्ट इंडिज दौरा – जुलै/ऑगस्ट (३ वनडे, ५ टी-२० सामने)
  • भारताचा श्रीलंका दौरा – ऑगस्ट (२ टी-२० सामने)
  • आशिया कप २०२२ – ऑगस्ट/सप्टेंबर
  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – सप्टेंबर (३ -२० सामने)
  • टी-२० विश्वचषक २०२२ – ऑक्टोबर/नोव्हेंबर

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!