Share

IPL 2022 : ब्रेट लीनं उमरान मलिकची तुलना केली पाकिस्तानच्या ‘या’ वेगवान गोलंदाजाशी; म्हणाला…!

Published On: 

मुंबई : आयपीएलच्या १५ व्या मोसमात आपल्या वेगवान माऱ्याने सगळ्यांना प्रभावित करणारा वेगवान गोलंदाज उमरान मलिकबद्दल ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीचं वक्तव्य समोर आलं आहे. तो म्हणतो की या गोलंदाजात वेगाने गोलंदाजी करून लोकांना प्रभावित करण्याची क्षमता आहे. लीने उमरानची तुलना पाकिस्तानच्या माजी वेगवान गोलंदाजाशी केली आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात उमरानने एकूण २२ विकेट घेतल्या आहेत. त्याने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध १५७ किमी वेगाने गोलंदाजी करण्याची कामगिरी केली.

ली म्हणाला, “मी त्याचा खूप मोठा चाहता झालो आहे. मला वाटते की उमरान मलिकमध्ये बरीच क्षमता आहे जी अजून बाहेर येणे बाकी आहे. तो एक स्पर्धात्मक खेळाडू असुन तो अनेक वेगवान गोलंदाजांप्रमाणे धावतो. उमरान मलिक जेव्हा गोलंदाजी करण्यास धावत येतो तेव्हा वकार युनूस या गोलंदाजाचे नाव माझ्या मनात येते.”

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ आयपीएलच्या बाद फेरीत पराभूत होऊन यावेळी पुन्हा स्पर्धेतून बाहेर पडला. विराट कोहलीची कामगिरी संघासाठी चिंताजनक होती. तो सतत धावा काढण्यासाठी धडपडताना दिसला. १७ आयपीएल सामन्यांमध्ये त्याला केवळ ३४१ धावा करता आल्या आहेत. यावर ब्रेट ली म्हणाला की, आशा आहे की तो लवकरच पुनरागमन करेल.

विराट कोहलीबद्दल बोलताना ली म्हणाला, “जगातील इतरांप्रमाणेच मी विराट कोहलीचा खूप मोठा चाहता आहे. मला आशा आहे की तो ज्या संधीच्या शोधात आहे ती संधी त्याला मिळेल. त्याला फक्त थोडा वेळ हवा आहे. कुटुंबासोबत थोडा वेळ घालवून त्याने स्वत:ला पुन्हा तयार करावे आणि आशा आहे की तो पुन्हा मैदानात चाहत्यांना शतक झळकावताना दिसेल.”

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!