Share

“पवार घराणाच्या सातबाऱ्यावरती चौंडी नाही” ; सदाभाऊ खोत यांची जहरी टीका

Published On: 

जेजुरी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज 297वी जयंती आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या अहमदनगरमधील चौंडी येथे कार्यक्रमाचे आयोजन आमदार रोहित पवार यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे. चौंडीत जाण्यापासून भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना पोलिसांनी अडवलं आहे. यानंतर सदाभाऊ खोत यांनी पवार घराण्यावरून जोरदार टीका केली आहे.

सदाभाऊ खोत आणि पोलीस यांच्यात बाचाबाची झाली आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना पोलिसांनी अडवल्यानंतर राजकीय वाद पेटले आहेत. पवार घराणाच्या सातबाऱ्यावरती चौंडी नाही, चौंडीत जाण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकत नाही. असे बोलत रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी पवार घराण्यावर जहरी टीका केली आहे.

सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकरांचा ताफा अडवला असल्याने परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे. यावेळी गोपीचंद पडळकरांनी देखील माध्यमांशी बोलताना रोहित पवार आणि शरद पवार यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे. “पोलीसबळाचा वापर करत आहेत. अहिल्यादेवीच्या जयंती निम्मित तुम्ही आज कित्ती चुकीच्या पद्धतीने वागताय यातून तुम्हाला काय संदेश देयचा आहे? हे सर्व महाराष्ट्रातील लोक पाहत आहेत. तुमच्यात धमक असेल तर समोरासमोर सभा भरवा,” असे थेट आव्हानच यावेळी त्यांनी केले आहे. तसेच रोहित पवारांच्या बापाने कायदा लिहिलाय का? असा सवालही यावेळी त्यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!