🕒 1 min read
मुंबई : वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रामनरेश सारवान याने पुरुष वरिष्ठ आणि कनिष्ठ संघाच्या निवड समिती पदाचा राजीनामा दिला आहे. सारावानने राजीनाम्यामागे वैयक्तिक कारण दिले आहे. त्याचा कार्यकाळ २०२४ पर्यंत होता मात्र पाच महिन्यातच त्याने अचानक हे पद सोडण्याचा निर्णय घेतला. सारवानच्या जागी रॉबर्ट हेन्स यांच्याकडे हंगामी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
माजी लेग-स्पिनर हेन्स सध्या ज्युनियर पॅनलमधील निवडकर्त्यांपैकी एक आहे. डेसमंड हेन्स हे वरिष्ठ पुरुष संघाच्या सध्याच्या निवड समितीचे प्रमुख आहेत, तर मुख्य प्रशिक्षक फिल सिमन्स देखील त्याचा भाग आहेत. क्रिकेट वेस्ट इंडीजचे (CWI) क्रिकेट संचालक जिमी अॅडम्स हे सारवानच्या या निर्णयाने निराश झाले आहेत.
Ramnaresh Sarwan has left his job as a West Indies selector after just five monthshttps://t.co/qaYl2GA2Y4
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) May 30, 2022
क्रिकइन्फो वेबसाइटशी केलेल्या संभाषणात, अॅडम्स म्हणाले, “क्रिकेटमधील त्याचा प्रचंड अनुभव पाहता, रामनरेश सारवान निवडकर्त्याची भूमिका पुढे चालू ठेवू शकला नाही याबद्दल आम्ही निराश आहोत. मात्र, आम्ही त्याची कारणे समजून घेत त्याचा राजीनामा स्वीकारतो. या काळात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल आम्ही त्याचे आभारी आहोत.”
वेस्ट इंडिजचा संघ सध्या नेदरलँड्सच्या दौऱ्यावर आहे, जिथे त्यांना यजमानांसोबत तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. ३१ मे पासून वनडे मालिका सुरु होणार आहे. वेस्ट इंडिज संघाची कमान निकोलस पूरनच्या हाती आहे. नुकताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणाऱ्या किरन पोलार्डच्या जागी पूरनला कर्णधार बनवण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
