🕒 1 min read
मुंबई : भारतीय संघाचा युवा फलंदाज श्रेयस अय्यर दीर्घकाळापासून वेगवान गोलंदाजांविरुद्ध चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. सध्या सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या टी-२० मालिकेतही श्रेयस अय्यरला या गोष्टीचा सामना करावा लागत आहे. अय्यरला वेगवान गोलंदाजांविरुद्ध मोठे फटके खेळण्यात खूप अडचणी येत आहेत. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणलाही वाटते की, अय्यरने वेगवान गोलंदाजांविरुद्ध त्याच्या फलंदाजीवर काम करणे आवश्यक आहे. कारण तो अतिरिक्त वेगवान गोलंदाजांविरुद्ध धावांसाठी अत्यंत संघर्ष करत आहे. अय्यरने श्रीलंकेविरुद्धच्या घरच्या टी-२० मालिकेत तिसऱ्या क्रमांकावर चांगली कामगिरी केली होती. त्याने तीन अर्धशतके झळकावली आणि संपूर्ण मालिकेत एकदाही बाद न होता २०४ धावा केल्या होत्या.
मात्र, श्रेयस अय्यर सध्याच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत वेगवान गोलंदाजांसमोर झुंजताना दिसला आहे. वेगवान गोलंदाजीसमोर त्याची फलंदाजी कमकुवत दिसत आहे. स्टार स्पोर्ट्सवरील चर्चेदरम्यान, अय्यरला वेगवान गोलंदाजांविरुद्ध फलंदाजी सुधारण्याचा सल्ला देताना इरफान पठाण म्हणाला की, ‘होय, साहजिकच श्रेयसने मालिकेतच नव्हे तर मागील काही सामन्यांमध्ये वेगवान गोलंदाजाविरुद्ध विरुद्ध संघर्ष केला आहे. आयपीएलमध्ये १४० पेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करणाऱ्या वेगवान गोलंदाजांचा विचार केला तर श्रेयसला संघर्ष करावा लागला आहे. वेगवान गोलंदाज आणि विरुद्ध फलंदाजी करताना त्याचा स्ट्राईक रेट आही अत्यंत कमी असतो. श्रेयस फिरकीपटू विरुद्ध दमदार फलंदाजी करतो आणि त्याची ती फटकेबाजी या मालिकेतही पाहायला मिळाली आहे. श्रेयस अय्यर वेगवान गोलंदाजाच्या उसळलेल्या चेंडूवर फलंदाजी करताना झुंजतो. श्रेयस अय्यर ला त्याच्या या समस्येवर जास्त काम करण्याची गरज आहे.’
वेगवान गोलंदाजांविरुद्ध संघर्ष असूनही इरफान पठाणने श्रेयस अय्यरचे समर्थन केले आहे. इरफानने त्याचे वर्णन एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून केले. इरफानच्या मते, ‘श्रेयस अय्यरने त्याच्या फलंदाजाने अलीकडच्या काळात मिळालेल्या संधींचा चांगला उपयोग केला आहे. तो म्हणाला की, ‘त्याच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याचा फलंदाजीची सरासरी ५० अशी राहिला आहे. तो एक शानदार फलंदाज आहे आणि त्याने खरोखरच चांगली कामगिरी केली आहे. श्रेयसला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची जी काही संधी मिळाली, तेव्हा त्याने आपली भूमिका बजावली आहे.’
भारतीय संघाचा मालिकेतील शेवटचा सामना आज बंगळुरू येथे खेळला जाणार आहे. सध्या मालिकेत दक्षिण आफ्रिका आणि भारत २-२ अशा बरोबरीच्या स्थितीत आहेत. त्यामुळे या शेवटच्या निर्णायक सामन्यात जो संघ बाजी मारेल तो संघ मालिका जिंकण्यात यशस्वी ठरेल. आजच्या होणाऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघात बदल होण्याची शक्यता आहे. तर मागील दोन सामने जिंकल्यामुळे भारतीय संघात कोणतेही बदल पाहायला मिळणार नाहीत.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
