Share

IND vs SA : चौथ्या टी-२० मॅचमध्ये विजय मिळवल्यानंतर हार्दिक पंड्यानं काढली धोनीची आठवण; पाहा VIDEO!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२मध्ये गुजरात टायटन्सचे नेतृत्व करणारा अष्टपैलू हार्दिक पंड्या आता भारतीय संघात चमक दाखवत आहे. पंड्याने ३१ चेंडूत ४६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (IND vs SA) चौथ्या टी-२० सामन्यात टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या विजयासह भारताने आता पाच सामन्यांच्या मालिकेत २-२अशी बरोबरी साधली आहे.

सामना संपल्यानंतर हार्दिक पंड्याने बीसीसीआय टीव्हीसाठी दिनेश कार्तिकची खास मुलाखत घेतली. यादरम्यान हार्दिकने सांगितले की, त्याने गुजरातला आयपीएलचे जेतेपद कसे मिळवून दिले आणि कोणाच्या सल्ल्याने त्याने एवढे मोठे यश मिळवले.

हार्दिक म्हणाला, ”मी नेहमी माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा सल्ला घेतो. तो ज्या पद्धतीने शांत राहून आपली रणनीती सुधारतो, तो उत्तम आहे. माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच त्याने मला हा सल्ला दिला होता की तू संघाच्या धावसंख्येचा विचार करू नकोस. संघाची गरज काय आहे याचा विचार कर आणि मी आता तेच फॉलो करतो.”

गुजरात आणि टीम इंडियाकडून खेळताना तू आपल्या प्लॅनिंगमध्ये काय बदल करतो, असा प्रश्न कार्तिकने हार्दिकला विचारला. तेव्हा तो म्हणाला, ”मी माझ्या खेळात विशेष बदल करत नाही. मी फक्त माझी वेळ आणि माझ्या झोनमध्ये येणारा चेंडू खेळण्याचा प्रयत्न करतो. मी गुजरातसाठी खेळतो किंवा टीम इंडियासाठी.”

हार्दिक पंड्याने २०१६ मध्ये टीम इंडियासाठी टी-२० पदार्पण केले होते. तेव्हापासून तो एकूण ५८ टी-२० सामने खेळला आहे. दुखापतीमुळे तो सतत संघाबाहेर असला तरी त्याला जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा तो गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही विभागात मोठे योगदान देतो. त्यामुळेच त्याच्याकडे आयर्लंड दौऱ्यावर टीम इंडियाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!