🕒 1 min read
मुंबई: देशात सध्या अग्निपथ योजनामुळे वातावरण चांगलेच तापताना दिसून येत आहे. केंद्र सरकारने अग्निपथ भरती योजनेअंतर्गत तरुणांना केवळ चार वर्षांसाठीच सैन्यात भरती केली जाणार असल्याचे म्हटले आहे. देशातील तरुणांनी या योजनेला कडाडून विरोध केला आहे. यावरूनच राष्ट्रवादीनेही केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
मोदी सरकार सत्तेत येऊन आठ वर्ष झाली आहेत. या आठ वर्षात मोदी सरकारने आणलेल्या सर्व मोठ्या योजना सपशेल अपयशी ठरल्या आहेत. CAA, कृषी कायदे आणि आता अग्निपथ योजनेच्या विरोधात देशभर हिंसक आंदोलने होत आहेत. शेतकऱ्यांचे आंदोलन वर्षभर चालले. ७०० हून अधिक शेतकरी यामध्ये मृत्यूमुखी पडले. आता अग्निपथ योजना लादून मोदी सरकार युवकांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न करत आहे का? असा संतप्त सवाल राष्ट्रवादीने केला आहे.
जनतेचा रोष असाच वाढत राहिल्यास ज्याप्रमाणे या देशाने मोदींची एकही मोठी योजना स्वीकारली नाही, त्याप्रमाणे आता २०२४ ला देशाची जनता मोदींना देखील स्वीकारणार नाही.
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) June 17, 2022
जनतेचा रोष असाच वाढत राहिल्यास ज्याप्रमाणे या देशाने मोदींची एकही मोठी योजना स्वीकारली नाही, त्याप्रमाणे आता २०२४ ला देशाची जनता मोदींना देखील स्वीकारणार नाही. असा दावाही राष्ट्रवादीने केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- पंतप्रधान मोदींच्या आईने गाठली वयाची ‘शंभरी’; निवासस्थानी जाऊन घेतली भेट
- पंतप्रधान मोदी आतापर्यंतचे सर्वाधिक गोंधळलेले पंतप्रधान; ‘राष्ट्रवादी’ची टीका
- पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर ध्वनी प्रदूषणाची समस्या; सुप्रिया सुळेंनी केली गडकरींकडे ‘ही’ मागणी
- IND vs SA 4th t20 : भारताचं दमदार कमबॅक..! दक्षिण आफ्रिकेला ८२ धावांनी हरवत मालिकेत साधली बरोबरी
- IND vs SA 4th T20 : वय फक्त आकडाच..! तब्बल १६ वर्षानंतर कार्तिकनं ठोकलं पहिलं अर्धशतक; वाचा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
