मुंबई : भारताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (IND vs SA) चौथ्या टी-२० सामन्यात शानदार अर्धशतक झळकावले. १ डिसेंबर २००६ रोजी भारताचा पहिला टी-२० सामना खेळला गेला. या पदार्पणाच्या सामन्यातही दिनेश कार्तिक खेळला होता. र्तिकने आज २६ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.
दिनेश कार्तिकच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे पहिले अर्धशतक आहे, जे त्याच्या पदार्पणानंतर जवळपास १६ वर्षांनंतर आले आहे. विशेष म्हणजे, दिनेशने आपला पहिला आंतरराष्ट्रीय टी-२० सामनाही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला. कार्तिक हा टी-२० मध्ये अर्धशतक झळकावणारा सर्वात वयस्कर भारतीय खेळाडू आहे. वयाच्या ३७ वर्षे १७ दिवसात त्याने हा पराक्रम केला.
Dinesh Karthik departs after smashing his first T20I fifty ????
Man on a mission ????#DineshKarthik #India #INDvsSA #Cricket #T20Is pic.twitter.com/cvIx5LGfjq
— Wisden India (@WisdenIndia) June 17, 2022
भारताचा डाव
चौथ्या टी-२० सामन्यात आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीने सलामीवीर ऋतुराज गायकवाडला (५) स्वस्तात बाद करत भारताला पहिला धक्का दिला. त्यानंतर आलेले श्रेयस अय्यर (४), कप्तान ऋषभ पंत (१७) हे फलंदाजही डाव सावरू शकले नाहीत. इशान किशनने २७ धावा केल्या, पण तो सातव्या षटकात बाद झाला. ४ बाद ८१ अशी धावसंख्या असताना हार्दिक पंड्या आणि दिनेश कार्तिक यांनी अर्धशतकी भागीदारी केली. कार्तिकने तुफानी अंदाजात फलंदाजी करत २७ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकारांसह ५५ धावा केल्या. शेवटच्या षटकात तो बाद झाला. हार्दिकने ३ चौकार आणि ३ षटकारांसह ४६ धावा केल्या. २० षटकात भारताने ६ बाद १६९ धावा फलकावर लावल्या. एनगिडीने आफ्रिकेकडून सर्वाधिक २ बळी घेतले.
आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये अर्धशतक ठोकणारा सर्वात वयस्कर भारतीय
- ३७ वर्ष १६ दिवस : दिनेश कार्तिक (वि. SA, राजकोट, २०२२)
- ३६ वर्ष २२९ दिवस : महेंद्रसिंह धोनी (वि. SA, सेंच्युरियन, २०१८)
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

