मुंबई : मागील अनेक दिवसांपासून शिवसेना नेत्या दिपाली सय्यद आपल्या अनोख्या शैलीत विरोधकांवर निशाणा साधत आहेत. आता सय्यद यांनी ‘संभाजीनगर’ नामांतराच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना माफी मागण्याचं आव्हान दिलं आहे. ट्विट करत भाजपच्या नुकत्याच निलंबित झालेल्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्यावरही निशाणा साधलाय. देश झुकणार नाही, भाजपच्या पापात देश सामील होणार नाही, असं दिपाली सय्यद यांनी म्हटलं आहे.
दिपाली सय्यद यांनी एक ट्विट केलंय. अप्रत्यक्षपणे त्यांनी थेट अमित शाह यांच्यावर निशाणा साधलाय. “संभाजीनगर हे नाव आम्ही अभिमानाने घेत आहोत पण नुपूर शर्मा मुळे देशाचे नाव खराब होता कामा नये. देश नही झुकने दुंगा विसरलात का? भाजपच्या मोठाभाईला माफी मांगायला सांगा तुमच्या पापात देश सहभागी होणार नाही”, असं दिपाली सय्यद ट्विट करून म्हणाल्या आहेत.
संभाजीनगर हे नाव आम्ही अभिमानाने घेत आहोत पण नुपूर शर्मा मुळे देशाचे नाव खराब होता कामा नये. देश नही झुकने दुंगा विसरलात का? भाजपच्या मोठाभाईला माफी मांगायला सांगा तुमच्या पापात देश सहभागी होणार नाही. @narendramodi @ShivSena
— Deepali Sayed (@deepalisayed) June 9, 2022
भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मोहंमद पैगंबरांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे जागतिक पातळीवर भारताची प्रतिमा खराब झाली. आंतरराष्ट्रीय दबाव भारतावर वाढत असताना, नुपूर यांना निलंबित करण्यात आलं. याच मुद्द्यावरून आता दिपाली सय्यद यांनी भाजपला घेरलंय. तसंच अमित शाहा यांना माफी मागण्याचं आव्हान दिलंय.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

