मुंबई : इंग्लंड दौऱ्यावर (IND vs ENG) कसोटी सामन्यासाठी गेलेल्या भारतीय संघाने सराव सत्रात भाग घेतला. लीसेस्टरशायरविरुद्धच्या सराव सामन्यापूर्वी टीम इंडियाचे वरिष्ठ खेळाडू नेट्समध्ये घाम गाळताना दिसले. भारतीय कर्णधार रोहित शर्मानेही काही आकर्षक फटके मारले. बहुप्रतिक्षित कसोटी सामन्यासाठी कर्णधार रोहित शर्मा त्याच्या पहिल्या नेट्स सत्रात सहकारी सलामीवीर शुबमन गिलसोबत फटके खेळताना दिसला. भारतीय संघ २४ ते २७ जून दरम्यान काऊंटी संघाविरुद्ध ४ दिवसांचा सराव सामनाही खेळणार आहेत. पाचव्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियासाठी हा सराव सामना अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.
बीसीसीआयने आपल्या ट्विटरवर सराव सत्राची एक छोटी क्लिप पोस्ट केली आहे. यामध्ये रोहित शर्मा फ्रंट फूट आणि शॉर्ट बॉल्सवर सराव करताना दिसला. या सत्रात शुबमन गिलही उपस्थित होते. रोहित शर्मा नुकताच संघात सामील झाला आहे.
https://twitter.com/ILoveYouJanu69/status/1539084577964060672
यापूर्वी ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिका खेळल्यानंतर लंडनला रवाना झाले होते. दोघेही संघात सामील होतील. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी-२० मालिका रविवारीच संपली. अशा स्थितीत दोन्ही खेळाडू इंग्लंडला उशिरा गेले आहेत. संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडही त्याच्यासोबत इंग्लंडला गेला आहे.
गेल्या वर्षी भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका झाली होती. यामध्ये कोरोना व्हायरसमुळे शेवटचा सामना खेळला गेला नाही. टीम इंडिया मालिकेत २-१ने आघाडीवर आहे. आता शेवटचा सामना होणार आहे. विशेष बाब म्हणजे दोन्ही संघांमध्ये तत्कालीन कर्णधार जो रूट आणि विराट कोहली यांनी कप्तानपद सोडले असून त्यांच्या जागी बेन स्टोक्स आणि रोहित शर्मा यांची वर्णी लागली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

