मुंबई : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी बीसीसीआयने आज दुसरी मोठी आनंदाची बातमी दिली आहे. बीसीसीआयने दक्षिण आफ्रिका विरुध्दच्या टी२० मालिकेतील ५ सामन्यासाठी भारतीय संघ घोषित केला आहे. त्यानंतर आता बीसीसीआयने गेल्यावर्षी इंग्लंडविरुद्ध न झालेला पाचवा कसोटी सामन्यासाठीही संघ घोषित केला आहे. हा कसोटी सामना १ जून ते ५ जून यादरम्यान खेळला जाणार आहे.
आयपीएल २०२२ मध्ये भारतीय स्टार खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या कामगिरीने चाहत्यांना चांगलेच निराश केले आहे. या एका कसोटी सामन्यात हे दोन्ही खेळाडू कशी कामगिरी करतात याकडे सर्वांचे लक्ष्य असणार आहे
TEST Squad – Rohit Sharma (Capt), KL Rahul (VC), Shubman Gill, Virat Kohli, Shreyas Iyer, Hanuma Vihari, Cheteshwar Pujara, Rishabh Pant (wk), KS Bharat (wk), R Jadeja, R Ashwin, Shardul Thakur, Mohd Shami, Jasprit Bumrah, Mohd Siraj, Umesh Yadav, Prasidh Krishna #ENGvIND
— BCCI (@BCCI) May 22, 2022
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, आर अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा.
महत्वाच्या बातम्या:
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

