Share

“राज ठाकरेंना मिर्ची का लागली?” ; रवी राणांचा राज ठाकरेंवर पलटवार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी २३ एप्रिलला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर मुंबईत गोंधळ निर्माण झाला होता. शिवसैनिक आक्रमक झाले होते. त्यावेळी राणा दाम्पत्यांना पोलीसांनी अटक केली होती. दरम्यान, आज पुण्यातील जाहीर सभेत राज ठाकरेंनी राणा दाम्पत्याला जोरदार टोला लगावला.

मी म्हटलं जर मशिदीवर बांग जोरात लागली तर त्याच्यासमोर हनुमान चालीसा लावा. हे राणा दाम्पत्य उठलं आणि मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा म्हणायला गेले. ती काय मशीद आहे का?, असे राज ठाकरे म्हणाले. यावर आमदार रवी राणा यांनी पलटवार केला आहे.

वनीत राणा म्हणाले, “महाराष्ट्राच्या सुख शांतीसाठी हनुमान मातोश्रीवर जाऊन हनुमान चाळीसा वाचू असे आम्ही सांगितले. पण आमच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून आम्हाला 14 दिवस जेलमध्ये टाकले, एका महिला खासदाराला लॉकअप मध्ये टाकले. यावर राज ठाकरे एक शब्द बोलले नाहीत आणि आज राज ठाकरे बोलले त्यावर मला त्यांना विचारावं वाटत आहे. तुम्ही जेव्हा औरंगाबादला सभा घेता, भडकाऊ भाषण घेता तेव्हा तुमच्यावर गुन्हा दाखल केला जात नाही. कारण सभेच्या ठिकाणी मॅच फिक्स केली जाते म्हणून कारवाई होत नाही. मला माहित आहे मातोश्री ही मशीद नाही, ते हिंदूंचं श्रद्धास्थान आहे आणि त्या ठिकाणी हनुमान चाळीसा वाचणे हा राजद्रोह होऊ शकत नाही. पण तरीही आमच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला”.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!