मुंबई : यावर्षी महाविकास आघाडी सरकार हे महिला शेतकरी सक्षमीकरणाठी प्रयत्न करणार आहे. आतापर्यंत महिला शेतकऱ्यांच्या योजनेत 30 टक्के सहभाग होता, तो वाढवून 50 टक्के पर्यंत केला जाणार आहे. त्यामुळे महिलांचे शेती व्यवसायातील योगदान वाढणार आहे.
यासह ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्ज भरले आहे. अशा शेतकऱ्यांना 50 हजार रुपये दिले जाणार आहेत. सन 2017-18, सन 2018-19 आणि सन 2019-20 या वर्षात घेतलेल्या पीक कर्जाची दिनांक 30 जून 2020 पर्यंत नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सन 2018- 19 मध्ये घेतलेल्या पीक कर्ज रकमेवर ही 50 हजार रुपये दिले जाणार आहेत. ज्या शेतकऱ्यांनी 2018-19 मध्ये पीककर्ज घेतलेले आहे पण त्यांची रक्कम ही 50 हजारापेक्षा कमी आहे त्यांना कर्जाएवढ्या रकमेची मदत केली जाणार असल्याचे देखील सांगितले आहे.
ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्ज भरले आहे त्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. पण कोरोना आणि राज्य सरकारच्या आर्थिक स्थितीमुळे ही रक्कम शेतकऱ्यांना अदा केलेली नव्हती. आता ही रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला असून राज्यातील 20 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. यासाठी 10 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

