Share

Jayant Patil : “राजकारणात जर पुढे यायचे असेल तर…” ; जयंत पाटील यांचे वक्तव्य

Published On: 

नाशिक : राजकारणात जर पुढे यायचे असेल तर आपली जबाबदारी ओळखून प्रत्येकाने काम केले पाहिजे. लोकशाहीची व्यवस्था मान्य करून सर्वमान्य होणाऱ्या पदाधिकाऱ्याला काम करताना देखील आत्मविश्वास मिळतो, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. नाशिक जिल्ह्याच्या शहर व ग्रामीण कार्यकारिणीची त्यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी प्रदेशाध्यक्षांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

महाविकास आघाडी सरकार पडले पाहिजे. असा विचार करणारी लोक आज सत्तेत असून देखील असंतुष्ट आहेत, अशी टीका जयंतराव पाटील यांनी केली. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काम करीत आहे. तेव्हा पक्ष अधिक बळकट करण्यासाठी प्राधान्य द्या, असे मार्गदर्शन जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले.

यावेळी कोषाध्यक्ष हेमंत टकले, आ. दिलीप बनकर, आ.नितीन पवार, माजी खा. समीर भुजबळ, जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार, श्रीराम शेट्ये, देवीदास पिंगळे, जयंत जाधव, कोंडाजी मामा आव्हाड, शहर अध्यक्ष रंजन ठाकरे, अर्जुन टिळे, माजी आमदार दिपीका चव्हाण, संजय चव्हाण, नाना महाले, पुरुषोत्तम कडलग, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, युवती जिल्हाध्यक्ष अनिता भामरे, अंबादास खैरे आदी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!