🕒 1 min read
जळगाव : महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. यामुळे शेतीचे फार नुकसान झाले असून शेतकरी राजा मोठ्या संकटात आहे. चोपडा तालुक्यात पूर्व हंगामी कापसाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जात असते. सततच्या पावसामुळे या कापूस शेतीचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. ज्यांनी कर्ज काढून शेतीची कामं केली होती त्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना सरकार कडून आर्थिक मदत कशी मिळू शकते याकडे सर्वांचे लक्ष आहे.
या परिस्थिविषयी एक कापूस उत्पादक शेतकरी माध्यमांशी बोलताना म्हणाला की, चोपडा तालुक्यात पूर्व हंगाम कापसाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते गेल्या आठ-दहा दिवसापासून सतत पाऊस सुरू असल्याने कापसाच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे कापूस खराब होतोय कापसाच्या बोंडाला कोंब फुटत आहे शेतकऱ्यांच्या खर्च भरमसाठ झाला आहे मात्र या सततचा पावसामुळे उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे लागलेला खर्च तो देखील निघणार नाही सरकारने तात्काळ पंचनामाच्या आदेश द्यावेत व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा कापूस उत्पादक शेतकरी करीत आहे शासन फक्त घोषणा करीत असतात प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नाही शासनाने घोषणा न करता प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी अशी मागणी कापूस उत्पादक शेतकरी करीत आहे.
महत्वाच्या बातम्या
- Rupali Thombare | “… मग आता देवेंद्र फडणवीस शिंदे गटावर कारवाई करणार का?”, रुपाली ठोंबरेंचा उपमुख्यमंत्र्यांना सवाल
- Health Tips | एका दिवसात किती मीठ, साखर आणि तेल खावे? WHO ने सर्वांना केलं अलर्ट
- Shivsena | “उलट-सुलट बोलाल तर, तुमची शुगर…”; शिवसेनेकडून नारायण राणेंना इशारा
- PNB Kisan Yojana | शेतीशी संबंधित प्रत्येक गरज आता होईल पूर्ण,शेतकऱ्यांच्या ‘या’ बँक अकाऊंट मध्ये होणार 50,000 रुपये जमा
- Shambhuraj Desai | राष्ट्रवादीतील अनेक लोक आमच्या संपर्कात ; शंभूराज देसाई यांचा मोठा दावा
- Supriya Sule | सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीतला फोटो मॉर्फ केलेला, FACT CHECK
- MNS | “वारसा मैदानाचा नसतो…”; मनसेची उद्धव ठाकरेंना कोपरखिळी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
