Share

Rupali Thombare | “… मग आता देवेंद्र फडणवीस शिंदे गटावर कारवाई करणार का?”, रुपाली ठोंबरेंचा उपमुख्यमंत्र्यांना सवाल

Published On: 

मुंबई : श्रीकांत शिंदे यांचे मुख्यमंत्र्यांचे खुर्चीत बसले असतानाचे छायाचित्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने टीका केली होती. त्यालाच प्रत्युत्तर देण्यासाठी शिंदे गटाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा फोटो माॅर्फ केला आहे. हा फोटो शीतल म्हात्रे यांनी ट्विट केला आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या रुपाली ठोंबरे यांनी प्रतिक्रीया देत देवेंद्र फडणवीस यांना सवाल केला आहे.

रुपाली ठोंबरे यांचा देवेंद्र फडणवीस यांना सवाल :

रुपाली ठोंबरे यांनी ट्विट करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल केला आहे. गद्दार फेम शीतल म्हात्रे ताई यांनी मिंधे गटाला खुश करण्यासाठी सुप्रिया सुळे ताई यांची महिला असूनही जाणीवपूर्वक मोबिंग फोटो करत बदनामी केली आहे, असं रुपाली ठोंबरे म्हणाल्या. तसेच अमृता फडणवीस ताई यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्यावर लगेच गन्हा दाखल होत कारवाई होते. मग तीच तत्परता मुख्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथं दाखवतील का?, असा सवाल देखील त्यांनी विचारला आहे.

पाहा ट्विटः

सुप्रिया सुळे यांची माफी मागावीः

दरम्यान, रुपाली यांनी शेअर केलेल्या ट्विटमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल होणारच ! त्यांनी तात्काळ माफी मागावी, असं आवाहन शिंदे गटाला विशेषतः शीतल म्हात्रे यांना दिलं आहे.

दरम्यान, श्रीकांत शिंदे यांच्या फोटोवरुन अनेकजण राज्य सरकारवर टीका करताना दिसत आहेत. हे छायाचित्र वर्षा बंगल्यावरच टिपण्यात आलेले आहे किंवा नाही, याबाबत अद्याप अधिकृत खुलासा होऊ शकलेला नाही. मात्र, फोटो व्हायरल होताच विरोधकांनी शिंदेंना धारेवर धरलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!