Share

Eknath Khadse | भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेवर एकनाथ खडसेंचे स्पष्टीकरण! म्हणाले, “BJP मध्ये मी…”

Published On: 

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रसने नेते, आमदार एकनाथ खडसे भाजपमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. खडसे यांनी अमित शहा यांची भेट घेतल्याची देखील जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान या चर्चेवर एकनाथ खडसे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

एकनाथ खडसे म्हणाले, “मी अमित शहा यांनी भेट घेतली नाही. मी त्यांना फोन केला होता. फोनवर आमची चर्चा झाली. ही चर्चा काही व्यक्तिगत कारणासाठी होती. याबाबत मी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना मी कल्पना दिली होती. मला शरद पवार यांनी सांगितले की आपण दोघे अमित शहा यांची भेट घेऊ. शरद पवार माझ्या सोबत असताना ते तर अमित शहांना म्हणणार नाहीत की एकनाथ खडसे आता भाजपमध्ये येतील त्यांना तुम्ही घ्या. त्यामुळे मी भाजपात जाणे शक्य नाही.”

राष्ट्रवादी काँग्रेसचा त्याग करण्याचा प्रश्न नाही-

“भाजपमध्ये मेहनत घेऊन मी कष्टाने काम केलेलं आहे. पण नंतरच्या कालखंडामध्ये मला अपमानास्पद वागणूक मिळाली. माझी अडवणूक झाली बऱ्याच केसेस माझ्यावर लादण्यात आल्या. खोट्या भूखंडाच्या केसेस करण्यात आल्या. त्यामुळे मी भाजप सोडली असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसने मला सन्मानाने विधान परिषदेवर पाठवले आहे. मी राजकारणातून बाहेर गेलेलो, अशावेळी मला राष्ट्रवादी काँग्रेसने मला मदत केली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा त्याग करण्याचा प्रश्न नाही.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!