Share

Rahul Narvekar : शिंदे-फडणवीस सरकार पहिल्या परीक्षेत पास, विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर

Published On: 

मुंबई : सध्या महाराष्ट्रात अनपेक्षित राजकीय घडामोडी घडत आहेत. आज झालेल्या विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिंदे-फडणवीस सरकारकडून भाजपचे राहुल नार्वेकर यांची वर्णी लागली आहे. त्यामुळे बंडखोरी करून भाजपच्या साथीने स्थापन झालेलं शिंदे सरकार आज पहिल्या कसोटीत पास झाले आहेत. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूकीत शिंदे सरकारने बाजी मारली आहे. या विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपच्या राहुल नार्वेकर यांना १६४ मते मिळाली. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे शिवसेना नेते राजन साळवी यांना १०७ मतं मिळाली. एकनाथ शिंदे गटातील आमदारांनी शिवसेनेने बजावलेल व्हीप झुगारून भाजपच्या राहुल नार्वेकर यांना मतदान केलं.

विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक ही नव्या नियमानुसार आवाजी पद्धतीने पार पडली. यामध्ये मनसे व वंचित बहुजन आघाडीने भाजपच्या राहुल नार्वेकर यांना साथ दिलेली पाहायला मिळाले.

शेवटी विधानसभेला अध्यक्ष मिळाले
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारल्यानंतर आपल्या सहकारी आमदारांसोबत भाजपशी हात मिळवणी करून सरकार स्थापन केले आहे. भाजप व शिंदे गटाकडे बहुमताचा आकडा असल्यामुळे त्यांचाच उमेदवार या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय ठरेल असा त्यांना विश्वास होता. गेल्या काही महिन्यांपासून विधानसभेचे अध्यक्षपद रिकामे होते. नाना पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदी गेल्याने त्यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून महाविकास आघाडी सरकार व राज्यपाल यांच्यातील वादामुळे हे पद रिक्तच राहिले होते. त्यानंतर बऱ्याच महिन्यांनी आता विधानसभेला अध्यक्ष मिळाले आहेत. १६४ मतांसह भाजपचे राहुल नार्वेकर हे नवे विधानसभा अध्यक्ष बनले आहेत.

राहुल नार्वेकर हे सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष ठरले आहेत. ते पहिल्यांदा शिवसेना या पक्षात होते. तसेच ते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय ही मानले जात होते. त्यानंतर त्यांनी मतभेदांमुळे शिवसेना पक्ष सोडला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्याच विधानसभा निवडणुकांमध्ये राहुल नार्वेकर हे कुलाबा मधून आमदार म्हणून निवडून आले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!