🕒 1 min read
मुंबई : जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांनी इंग्लंडविरुद्धच्या (ENG vs IND) पाचव्या कसोटीत टीम इंडियाला मजबूत स्थितीत पोहोचवले आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने पहिल्या डावात केवळ ८४ धावांत ५ विकेट गमावल्या होत्या. भारतीय संघाकडे अजूनही ३३२ धावांची आघाडी आहे. जॉनी बेअरस्टो १२ धावांवर खेळत आहे. जो रूटला मोठी खेळी खेळता आली नाही. टीम इंडियाने पहिल्या डावात ४१६ धावा केल्या आहेत. ऋषभ पंतनंतर रवींद्र जडेजानेही शतक झळकावले. मात्र, पावसामुळे तीन वेळा खेळ थांबवावा लागला. बुमराहने आतापर्यंत ३ बळी घेतले आहेत. त्याचवेळी शमी आणि सिराजला प्रत्येकी एक विकेट मिळाली. पाच सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ २-१ने आघाडीवर आहे.
तत्पूर्वी, जसप्रीत बुमराहने दिवसाच्या सुरुवातीच्या सत्रात अॅलेक्स लीस (६), त्यानंतर दुसऱ्या सत्रात जॅक क्रॉली (९) आणि ऑली पोप (१०) यांना स्लिपमध्ये झेलबाद केले. क्रॉलीचा झेल शुबमन गिलने तर पोपचा झेल श्रेयस अय्यरने टिपला. यानंतर रूट आणि बेअरस्टो यांनी संघाला सांभाळण्याचा प्रयत्न केला. रुट ३१धावा काढून मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर बाद झाला. जॅक लीचला शमीने शून्यावर बाद केले. बेअरस्टोसह कर्णधार बेन स्टोक्स शून्यावर नाबाद आहे. पावसामुळे इंग्लिश संघाला आतापर्यंत केवळ २७ षटकेच फलंदाजी करता आली आहे.
That's Stumps on Day 2 of the #ENGvIND Edgbaston Test! #TeamIndia put on a fantastic show with the ball, scalping 5 England wickets, after posting 416 on the board. ???? ????
We will be back for Day 3 action tomorrow.
Scorecard ▶️ https://t.co/xOyMtKrYxM pic.twitter.com/Q2kLIFR7O0
— BCCI (@BCCI) July 2, 2022
जसप्रीत बुमराहने १६ चेंडूत ३१ धावांची नाबाद खेळी खेळली आणि एजबॅस्टनच्या चाहत्यांनां त्याच्या बॅटमधून केलेल्या विक्रमी धावा वर्षानुवर्षे लक्षात राहतील. त्याने स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात अतिरिक्त धावा पकडून ३५ धावा काढल्या. कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात बुमराहने ब्रायन लाराचा १८ वर्षांचा जुना विक्रम मोडीत काढला. त्याने ब्रॉडला ४ चौकार आणि २ षटकार ठोकले. भारताच्या शेवटच्या तीन जोडीने ९३ धावांचे योगदान दिले.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
