Share

मराठा आरक्षणासाठी राजे एकत्र येतात तर मग ओबीसी आरक्षणासाठी अठरापगड जातीचे मावळे एकत्र येतील

Published On: 

सांगली : जर का मराठा समाजाच्या आरक्षणासाठीच सर्व राजे एकटवणार असतील तर आम्ही देखील अठरापगड जातीचे मावळे जमवून ओबीसी आरक्षणाचे रक्षण करु, असे वक्तव्य ओबीसी समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी केले.

मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. मात्र, ओबीसीच्या कोट्यातून त्यांना आरक्षण देण्यास आमचा विरोध आहे. आमचे आरक्षण गिळंकृत करण्याचा डाव आखला जात आहे, असे प्रकाश शेंडगे यांनी म्हटले. त्यामुळे आता यावर मराठा समाजातून काय प्रतिक्रिया उमटणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ते शनिवारी सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेत संबंधितांना इशारा दिला. महाराष्ट्रात आरक्षणाचा खेळखंडोबा सुरु आहे. अठरापगड जातींचं आरक्षण हडप करण्याचा त्यावर डल्ला मारण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शेंडगे यांनी केला. राज्यात सर्व ७५ टक्के नोकरभरतीच्या प्रक्रिया थांबल्या आहेत. ओबीसी समाजाच्या नोकऱ्यांवर आणि हक्कावर गदा आणली जात आहे. १३ टक्के मराठा बांधवांसाठी ८७ टक्के एससी, ओबीसी आणि अन्य प्रवर्गातील नागरिकांचे हाल सुरु असल्याचे प्रकाश शेंडगे यांनी म्हटले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!