नवी दिल्ली : आज दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत कॉंग्रेस नेते गुलाब नबी आझाद, TMC चे नेते सुदीप बंद्योपाध्याय, SAD चे नेते बलविंदर सिंह भांडेर आणि शिवसेना खासदार विनायक राऊत हे देखील उपस्थित होते. यावेळी JDU खासदार आरसीपी सिंह यांनी केंद्राच्या कृषी कायद्याला समर्थन दिले असल्याची माहिती मिळाली आहे
या बैठकीत कृषी कायदा आणि शेतकरी आंदोलनाबाबत चर्चा झाली . ‘केंद्र सरकार कृषी कायद्याच्या भूमिकेवर ठाम आहे. सरकारला कृषी कायद्यांवर शेतकऱ्यांशी चर्चा करायची आहे, असे मोदींनी स्पष्ट केले आहे. तसेच विरोधकांनीही शेतकऱ्यांशी याबाबत चर्चा करावी, असे आवाहन केले आहे.
‘केंद्र सरकार कृषी कायद्याच्या संदर्भात आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा करण्यास तयार आहे. विरोधकांनीही शेतकऱ्यांशी याबाबत चर्चा करावी. कायदा आपलं काम करेल. दीड वर्षे कायदे स्थगित करण्याची ऑफर कायम आहे, असे मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीत म्हटलं आहे.
या बैठकीत शिवसेना खासदार विनायक राऊत अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केलेत. महाराष्ट्र-बेळगाव सीमा वादप्रकरणी बेळगावला केंद्रशासित राज्य करावा अशी मागणी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ब्रेकिंग न्यूज : संजय राऊत आंदोलनस्थळी जाऊन शेतकऱ्यांना भेटण्याची शक्यता
- निवडणूक बिनविरोध करत ‘वृद्धेश्वर’ सहकारी कारखान्यावर पुन्हा राजळेंची सत्ता
- स्वच्छता कर्मचाऱ्यांनी परिसराचे रुपडेच पालटले
- खासदारांनी आकडे मोड नीट करावी – राजू तनवाणी
- उस्मानाबादचे व्यापारी जीएसटी विरोधात आक्रमक


